साप, अजगर यांसारखे प्राणी फक्त फोटोत किंवा व्हिडीओतच पाहायला चांगले वाटतात. प्रत्यक्षात साप समोर आला तर काय होईल याची कल्पना सुद्धा केली तरी भीतीने थरकाप होतो. सध्या सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरूण अजगराच्या विळख्यात सापडला आहे.
हा भयानक व्हिडीओ ट्विटर युजर @_Shaikirshad_ ने १६ डिसेंबरला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं होतं की, एक तरूण स्वतःला अजगराच्या तावडीतून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही लोक या तरूणाला अजगरापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या अजगराची पकड घट्ट असल्यामुळे काही केल्या तरूणाची सुटका होऊ शकत नाही.
29 सेकंदाच्या या थरारक व्हिडीओने काळजाचा ठोका चुकवला आहे. अवाढव्य अजगराने या तरूणाच्या शरीराला पूर्णपणे घेरलेलं आहे. हा व्हिडीओ अशा पॉईंन्टला येऊन संपतो जिथे अजगरापासून या माणसाला वाचवण्यात यशं आलं की नाही याबाबत माहिती मिळू शकत नाही. या व्हिडीओ लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना हा अजगर खूप शक्तीशाली असल्याचे म्हटले आहे. अरेरे! आईनं सोडलं, वडील तुरूंगात; ९ वर्षाच्या चिमुरड्यावर आली रस्त्यावर राहण्याची वेळ