शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 22:58 IST

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या लहान मुलाला सिंहासोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे.

आजकाल व्हिडीओ आणि रील्सचा जमाना आहे. लोक तासंतास रील्स पाहण्यात घालवतात आणि त्यापैकी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यानंतर एका युवकाच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या लहान मुलाला सिंहासोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे. तो मुलाला सिंहाच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना मुलगा रडू लागतो, हे बघून आता सगळेच व्हिडीओतल्या बाबांवर टीका करत आहेत.

सिंहाच्या पाठीवर बसवताना मुलगा रडू लागला'बॅडपैरेंटिंगटीव्ही' (BadparentingTV) नावाच्या इन्स्टाग्राम हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात एका पिंजऱ्यात सिंह बसलेला दिसतोय. तो तरुण आपल्या लहान मुलाला त्याच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी सिंह अचानक मागे फिरतो, ज्यामुळे मुलाला आणखी भीती वाटते. छोटा मुलगा सतत रडत राहतो, पण त्याचे वडील हे पाहून हसतात. सुदैवाने, सिंहाने मुलाला कोणतीही इजा केली नाही. काही वेळाने तो तरुण मुलाला घेऊन तिथून दूर जातो. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "एक वडील सिंहासोबत आपल्या मुलाचा फोटो घेण्यासाठी जबरदस्ती करत आहेत."

नेटकऱ्यांकडून जोरदार टीकाया व्हिडीओला आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. युजर्स त्या युवकावर जोरदार टीका करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, "या माणसाला त्वरित अटक व्हायला पाहिजे आणि मुलाला त्याच्याकडून काढून घ्यायला पाहिजे."

दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "बिचारा सिंह! कोणत्याही प्राण्याचा वापर माणसांच्या मनोरंजनासाठी करू नये." आणखी एका युजरने याला 'बॅड पेरेंटिंग' म्हटले आहे. एका युजरने म्हटले की, "सिंह खूप क्यूट आहे." तर, तरुणावर संताप व्यक्त करत एका युजरने लिहिले की, "फक्त एका फोटोसाठी तुम्ही तुमच्या मुलाचा जीव धोक्यात घालत आहात. मुलांना जन्म देण्यापूर्वी पालकांनी 'पेरेंटिंग कोर्स' करायला पाहिजे."

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओJara hatkeजरा हटके