शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 18:37 IST

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो बघून नेटकरी अक्षरशः हसून हसून लोटपोट झाले आहेत.

चोरी करायला येणारे चोर अनेकदा सीसीटीव्हीमध्ये कैद होतात. अशा फुटेजमध्ये आपल्याला चोरांचेही अनेक प्रकार पाहायला मिळतात. काही चोर अगदी योजनाबद्ध असतात, तर काही अतिशय धिट तर काही अगदी हौशी चोर असल्यासारखे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो बघून नेटकरी अक्षरशः हसून हसून लोटपोट झाले आहेत. या व्हिडीओत एक चोर चोरी करण्यासाठी येतो, पण त्याच्या लोभामुळे त्याचीच चांगली फजिती होते. 

काय आहे नेमकं व्हिडीओत?

ही घटना उत्तराखंडमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की, एक तरुण चोर रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात प्रवेश करतो. घराचं थोडं निरीक्षण केल्यावर त्याला बाहेर ठेवलेला गॅस सिलेंडर दिसतो. बहुतेक त्याला वाटलं असावं की हा सिलेंडर विकून काही पैसे मिळतील, म्हणून लगेच तो खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करतो.

पण जसं तो सिलेंडर उचलून बाहेर गेटकडे निघतो, तसंच त्याचं संतुलन बिघडतं आणि सिलेंडरच्या वजनामुळे तो थेट समोर असलेल्या नाल्यात कोसळतो! ही घटना घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ एक्स या प्लॅटफॉर्मवर 'askbhupi' या युजरने पोस्ट केला आहे. पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आणि यावर मजेशीर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.

एका युजरने लिहिलं की, “चोरी करायची तर ताकद तरी ठेवावी, एवढा जड सिलेंडर उचलताना विचार तरी केला असतास!”तर दुसऱ्याने चोराची खिल्ली उडवत लिहिलं की,“चोरीचा विचार जड झाला... पण सिलेंडर जड वाटला नाही का?" आणखी एका वापरकर्त्याने तर थेट सिनेमातील डायलॉग वापरून लिहिलं की, “लोभ मोठा ना भावा, पण नाला त्यापेक्षा अजून मोठा!”

या चोराने सहजपणे चोरी करण्याचा विचार केला खरा, पण प्रत्यक्षात परिस्थितीने त्याला चांगलाच धडा शिकवला.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलRobberyचोरी