शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Emotional Video: दमलेल्या बाबाची कहाणी... लेकीचं प्रेम पाहून ढसाढसा रडला बाप, Video एकदा पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:05 IST

वडीलांची झोपमोड होऊ नये म्हणून मुलगी दबक्या पावलाने येते अन्...

Father Daughter Emotional Video: घरातील वडीलधारी मंडळी काबाडकष्ट करतात तेव्हा त्यांची काळजी घ्यायला मुलं कायमच पुढे सरसावतात. कामाच्या ओझ्याने दमलेल्या पुरूषाची काळजी घेण्यासाठी त्याची पत्नी कायमच अग्रणी असते. पण त्यासोबत, लेक आणि बापाचं नातं हे काही औरच असतं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ असतात, ज्यात मुले आपल्या पालकांसाठी काहीही करण्यास तयार असतात. सध्या एक व्हिडिओ हजारो-लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जातोय. नक्की काय आहे तो व्हिडीओ अन् काय होतं त्या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया.

एका मुलीचे वडील दुकानात कामामुळे थकून झोपी गेलेले असतात. त्यावेळी त्याची चिमुरडी लेक तेथे येते आणि एक गोष्ट करते. वडिलांची झोपमोड होऊ नये म्हणून लेक ती कृती करून निघून जाते. पण जेव्हा वडील उठतात आणि लेकीचं प्रेम पाहून अक्षरश: लहान मुलासारखे ढसाढसा रडू लागतात. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून आता ते व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वांग नावाचा एक व्यक्ती एका रेस्टॉरंटमध्ये त्याच्या दुकानात टेबलावर डोके ठेवून झोपलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या काळात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. तेव्हापासून तो आपल्या कुटुंबासाठी खूप चिंतेत होता. इंस्टाग्रामवर पीपल नावाच्या अकाउंटने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये, वांग त्याच्या रेस्टॉरंटमध्ये विश्रांती घेताना दिसत आहे. जेव्हा तो झोपतो तेव्हा त्याची लहान मुलगी त्याच्या मागे येते आणि तिचे लहानसे जॅकेट त्याच्या अंगावर घालून निघून जाते.

काही काळानंतर, वांगला कळते की लेकीने तिच्या वडिलांच्या खांद्यावर जॅकेट घातले आणि ती निघून गेली. वडिलांना मदत करण्यासाठी त्याच्या मुलीने उचललेले छोटेसे पाऊल त्याच्या हृदयाला भिडते. सगळ्यांसाठी खंबीरपणे उभा राहणारा बाप अक्षरश: लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागतो. या व्हिडीओने इंटरनेटवर अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. लोकांनी व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये मुलीचे आणि बापाचे नाते यावर बऱ्याच कौतुकाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल