वॉश्गिंटन - अमेरिकेच्या जॉन एफ कॅनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनं जगभरात चर्चेला उधाण आले आहे. यामागचं कारण म्हणजे या महिलेकडे मिळालेला पासपोर्ट...हा पासपोर्ट टोरेंजा नावाच्या देशाचा आहे. टोरेंजा नावाचा देश जगाच्या नकाशात आणि कुठल्याही अधिकृत रेकॉर्डमध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे या महिलेचा आणि तिच्या पासपोर्टचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे.
एअरपोर्टवरील व्हायरल झालेल्या व्हिडिओत महिला टोरेंजा नावाच्या देशाचा पासपोर्ट हातात घेतलेली दिसते. या देशाची कुठलीही अधिकृत नोंदणी नसताना ही महिला टोरेंजा काकेशस क्षेत्रात असल्याचं सांगते. व्हिडिओतील पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक चिप्स आणि होलोग्रामसारख्या माहितीसोबत दुसऱ्या देशांचे तिकीट होते. जेव्हा या व्हिडिओची एआय मार्फत पडताळणी केली गेली तेव्हा फॅक्ट चेकर्सने हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवल्याचे सांगितले. JFK एअरपोर्टवर अशाप्रकारची कुठलीही घटना घडली नाही. त्याचे रेकॉर्डही नाही. मात्र या व्हायरल व्हिडिओने लोकांना १९५४ सालच्या जपानची राजधानी टोकियोतील घटनेची आठवण करून दिली आहे.
१९५४ मध्ये टोकियोच्या हानेडा विमानतळावर एका माणसाने टॉरेड नावाच्या अस्तित्वात नसलेल्या देशाचा असल्याचा दावा करून अधिकाऱ्यांना गोंधळात टाकले. टॉरेड हा फ्रान्स आणि स्पेनच्या दरम्यान स्थित एक लहान सार्वभौम राष्ट्र आहे असा त्याने आग्रह धरला, जिथे आज अँडोरा आहे. मात्र हे सत्य नव्हते. सोशल मीडियावर समोर आलेल्या टोरेंजा पासपोर्ट महिलेच्या व्हिडिओने लोकांना केवळ आश्चर्यचकित केले नाही तर एआय चुकीच्या माहितीचे जाळे देखील उघड झाले आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे खरा असल्याचे दिसून येते असं अनेकांनी म्हटले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत.
Web Summary : A video showing a woman with a passport from the non-existent country of 'Torenza' has gone viral, sparking debate. Fact-checkers reveal the video is AI-generated. The incident evokes memories of a similar 1954 Tokyo airport mystery.
Web Summary : 'टोरेन्ज़ा' नामक गैर-मौजूद देश के पासपोर्ट वाली एक महिला का वीडियो वायरल हो गया है, जिससे विवाद छिड़ गया है। फैक्ट-चेकर्स ने खुलासा किया कि वीडियो एआई-जनित है। यह घटना 1954 के टोक्यो हवाई अड्डे के रहस्य की याद दिलाती है।