waterproof jacket seller viral video: हल्लीच्या स्पर्धेच्या युगात ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी लोक नवनवीन शक्कल लढवत असतात. सोशल मीडियाच्या जगात असे हटके व्हिडिओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. व्हिडीओमध्ये एका दुकानदाराने आपल्या 'वॉटरप्रूफ' जॅकेटचा पुरावा देण्यासाठी जे काही केले, त्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या दुकानदाराची ही अनोखी मार्केटिंग स्टाईल सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दुकानदाराने काय केले?
व्हायरल व्हिडिओमध्ये अल्जेरियातील दुकानदार आपल्या दुकानात उभा होता. त्याला ग्राहकांना पटवून द्यायचे होते की तो विकत असलेले जॅकेट १०० टक्के वॉटरप्रूफ आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी त्याने कोणताही जाहिरातबाजीचा मार्ग न निवडता थेट 'देसी जुगाड' केला. दुकानदार जॅकेट घालून उभा राहिला. एक रबर ट्युबचा बाथ टब त्याने समोर ठेवला. त्यात फेसाळलेले साबणाचे पाणी होते. दुकानदाराने ते जॅकेट घालून त्या टबमध्ये उडी मारली. इतकेच नाही, तर तो एका बादलीने आपल्या अंगावर पाणी ओतून घेतानाही दिसला. पूर्णपणे ओला झाल्यानंतरही दुकानदार ज्या आत्मविश्वासाने आपले जॅकेट झटकून दाखवत होता, त्यावरून तो हेच सांगताना दिसला की, जॅकेट कोरडे आणि वॉटरप्रूफ आहे. या दुकानदाराची स्टाईल चर्चेचा विषय ठरली आहे.
हा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर @TansuYegen नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, "हे नेक्स्ट लेव्हल मार्केटिंग आहे!" तर दुसऱ्याने म्हटले, "भावा, तुझा कॉन्फिडन्स मानला पाहिजे!" काहींनी मात्र थट्टेने म्हटले की, जॅकेटला पाणी शोषायला वेळच मिळाला नाही, पण मार्केटिंगमध्ये मात्र दुकानदाराने बाजी मारली आहे.
Web Summary : An Algerian shopkeeper's innovative marketing went viral. To prove his jackets were waterproof, he jumped into a tub of soapy water while wearing one, impressing customers with his confidence and boosting sales.
Web Summary : अल्जीरियाई दुकानदार का अभिनव विपणन वायरल हुआ। अपनी जैकेट को वॉटरप्रूफ साबित करने के लिए, वह एक पहनकर साबुन के पानी के टब में कूद गया, जिससे ग्राहकों को उसके आत्मविश्वास से प्रभावित किया और बिक्री बढ़ी।