शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 00:05 IST

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे हेल्मेट न घालता, वाहतूक नियमांना बगल देत बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत होते.

सध्या सोशल मीडियावर जोडप्यांचे बाईकवरील प्रेम आणि स्टंटचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण दिल्ली-एनसीआरमधील नोएडा येथे घडलेल्या एका ताज्या घटनेत, चालत्या बाईकवरून धोकादायक पद्धतीने 'रोमान्स' करणाऱ्या एका जोडप्याला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. या रोमान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे हेल्मेट न घालता, वाहतूक नियमांना बगल देत बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत होते. नोएडा पोलिसांनी या जोडप्याला ५३,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

काय आहे प्रकरण?

रविवारी, सोशल मीडियावर अवघ्या सहा सेकंदांची एक क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये एक तरुण बाईक चालवत असून, एक मुलगी बाईकच्या टाकीवर बसून तरुणाला मिठी मारून 'रोमान्स' करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या हातात हेल्मेट होते, परंतु बाईकस्वाराने ते घातले नव्हते. या बाईकचा नंबर दिल्लीत नोंदणीकृत आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, दोघेही एक्सप्रेसवेवर हेल्मेटशिवाय वेगाने बाईक चालवत होते. मुलीने हेल्मेट हातात धरले होते. पण, दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातले नव्हते. हे जोडपे केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नव्हते, तर रस्त्यावरच्या इतर वाहनचालकांसाठीही मोठा धोका निर्माण करत होते.

सोशल मीडियावर टीकेचा भडीमारहा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.  अनेक युझर्सनी जोडप्याच्या या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली. अनेकांनी त्यांच्या बेजबाबदार वर्तनाला 'धोकादायक' म्हटले आणि अशा लोकांमुळे एक्सप्रेसवेवर अपघात होऊ शकतात अशी चिंता व्यक्त केली. काही जणांनी याला रस्ता सुरक्षा नियमांचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे सांगत पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली.

नोएडा वाहतूक डीसीपी लखन सिंह यादव यांनी या प्रकरणाची दखल घेतली. ते म्हणाले की, "व्हिडीओची दखल घेऊन आम्ही मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली ५३,५०० रुपयांचे चलन (दंड) जारी केले आहे." त्यांनी सांगितले की, हे प्रकरण रविवारी दुपारी सेक्टर-३९ पोलीस स्टेशन परिसरातील असून, त्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओbikeबाईकdelhiदिल्ली