देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लग्नानंतर ६ महिन्यांतच महिला नवऱ्याच्या भावाच्या प्रेमात पडल्याची घटना घडली. जेव्हा महिलेचा नवरा कामासाठी बाहेर जात असे तेव्हा तिचे त्याच्या मोठ्या भावासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमधील जवळीक इतकी वाढली की, तिने पहिल्या पतीला घटस्फोट न देताच मंदिरात दुसरं लग्न केलं. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडीओमध्ये महिला म्हणते की, "माझं लग्न होऊन फक्त सहा महिने झाले होते, पण मला माझा नवरा आवडत नव्हता. घरामध्ये माझा दीर होता. मी त्याच्याकडे आकर्षित झाले. हळूहळू, आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. जेव्हा माझा नवरा घराबाहेर असायचा तेव्हा आम्ही एकत्र वेळ घालवायचो आणि गप्पा मारायचो." सुरुवातीला महिलेने सांगितलं की, तिला तिचा पती आणि दिर दोघांसोबत राहायचं आहे, परंतु नंतर तिने फक्त तिच्या दिरासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
मंदिराबाहेर रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला दिसत आहे, तिच्यासोबत तिचा नवरा आणि दीर देखील होता. महिला तिच्या दिराबद्दल बोलत आहे. तसेच तिच्या नवऱ्यानेही तो कामासाठी बाहेर असल्याचं सांगितलं. दिराचा दावा आहे की त्याचा धाकटा भाऊ अभ्यासासाठी घरापासून दूर राहतो आणि या काळात तो त्याच्या पत्नीच्या जवळ आला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे आणि आतापर्यंत तो ६२ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लाखो लोकांनी ते लाईक आणि शेअर केला आहे, तर १६०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक लोक संताप व्यक्त करत आहेत.