woman punches man viral video: सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती कोणत्या तरी मुद्द्यावरून महिलेला सतत त्रास देत असतो. मात्र, व्हिडिओमध्ये पुढच्याच क्षणी ती महिला त्या तरूणाला अशी अद्दल घडवते की यापुढे कोणत्याही महिलेची छेड काढताना शंभर वेळा विचार करेल. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती स्त्री अवघ्या दोन पंचमध्ये त्या तरूणाला धडा शिकवते. व्हिडीओ पाहून नेटकरीही त्या महिलेला 'सुपरलेडी' म्हणत आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुरुष कोणत्या ना कोणत्या कारणावरून महिलेला त्रास देऊ लागतो. या काळात महिला खूप शांत राहते आणि सर्व काही सहन करून ऐकून घेते. त्यानंतर आणखी दोन जण येतात आणि त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करतात. पण तो व्यक्ती त्यांना बाजूला सारून रशियन महिलेच्या आणखी जवळ जातो. त्यावेळेस महिलेचा संयम संपतो आणि ती अवघ्या दोन बुक्क्यांमध्ये त्रास देणाऱ्या तरुणाला खाली पाडते व तेथून निघून जाते. पाहा व्हायरल व्हिडीओ-
एका ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट केली आहे, ही महिला तर 'सुपरलेडी' निघाली. दोन ठोसे मारून तिने माणसाला खाली पाडले. दुसरा युजर म्हणतो की, ही महिला प्रशिक्षित दिसते. तिने आश्चर्यकारक वेगाने त्या व्यक्तीला ठोसा मारला. आणखी एकाने लिहिले की, तिला केवळ महिला म्हणून नका, ती 'राणी' आहे. या महिलेचे कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट्स सोशल मीडियावर दिसत आहेत.