शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Video: छोट्या मुलीने दाखवली डोकं चक्रावून टाकणारी जादू; लोकंही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 09:24 IST

चिमुरडीने केलेली जादू पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल

Three Eggs Magic Viral Video on Social Media: जादूचे खेळ लोकांना खूप आवडतात. जादू ही हातचलाखी असते हे साऱ्यांना माहिती असले तरीही जादूचे खेळ पाहण्याची मजा काही औरच असते. अमिताभ बच्चन यांच्या 'जादूगार' या चित्रपटातील एका गाण्यातही हेच सांगितलं होतं की जादू म्हणजे केवळ हाताचा चलाखीने वापर, आणि ती चलाखी अशी असावी की कोणालाही कळू नये. असाच एका चिमुरडीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या छोट्या जादूगाराच्या जादूने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक मुलगी रस्त्यावर उभी आहे आणि तिच्या आजूबाजूला काही लोक उभे आहेत. त्या साऱ्या लोकांना ती चिमुरडी जादूचे खेळ दाखवत आहे. छोट्या जादूगार मुलीने टेबलावर ३ अंडी ठेवली आहेत आणि ती दोन वाट्यांनी झाकून ठेवली आहेत. त्यानंतर ती एक अंडे तिच्या हातात घेते आणि काठी फिरवते आणि दुसरी वाटी उघडते, तर सगळी अंडी त्या वाटीखाली असतात. हे सगळं ती इतक्या वेगाने करते की तिला हे सगळं कसं जमतं ते पाहून लोकंही आश्चर्यचकित होतात. पाहा व्हिडीओ-

चिमुरड्या जादूगाराचा हा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे. केवळ ३९ सेकंदांच्या या व्हिडिओने ट्विटरवर १.६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. अनेत युजर्स त्यावर कमेंट करून त्या चिमुरडीचं कौतुक करतानाही दिसत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलSocialसामाजिक