शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Video: मुंबईतल्या सिक्युरीटी गार्डने गायलं सुरेश वाडकर यांचं गाणं; रस्त्यावरून जाणारेही थांबून ऐकू लागले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 16:29 IST

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय, तुम्ही पाहिलात का?

 Security Guard Singing, Viral Video: प्रत्येकाला आपल्या आवडत्या कलाकारांना नाचताना किंवा गाताना पाहणे आवडते. पण असे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपली कला दाखवणारे लोक व्यावसायिक कलाकारांना स्पर्धा देताना दिसतात. मग ते चालत्या ट्रेनमध्ये सिद्धू मुसेवालाचे गाणे गाणारे लहान मूल असो, दात घासताना आपल्या आवाजाची जादू पसरवणारा बिहारचा मुलगा असो किंवा शेतात बसून मधुर आवाजात गुंजन करणारी आजी असो. अशा लोकांची प्रतिभा पाहून जनता थक्क होते. आता एका सुरक्षारक्षकाचे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आवाज ऐकून मन प्रसन्न होईल!

व्हायरल व्हिडिओ दीपिका (@Konjunktiv_II) नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी काम केलेल्या कोणत्याही कार्यालयात सुरक्षा रक्षकाला त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक बाजू अशा प्रकारे व्यक्त करू दिलेली नाही. मोठ्या ऑफिसमध्ये टॅलेंट शो व्हायलाच हवेत. परंतु गार्ड किंवा हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांना हजर राहण्यासाठी हा पर्याय छान आहे. ड्युटीवर असताना गार्डला गाण्याची परवानगी देणाऱ्या व्यक्तीला सलाम. या अवघ्या ५५ ​​सेकंदांच्या क्लिपमध्ये मुंबईतील आयएमसी (इंडियन मर्चंट्स चेंबर) चा एक सुरक्षा रक्षक 'उत्सव' चित्रपटातील गाणे गाताना दिसतो.

रस्त्यावरील लोक थांबून करतात वाहवा!

एका कार्यालयाच्या गेटवर गार्ड उभा असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या हातात माईक आहे आणि तो 1984 मध्ये आलेल्या 'उत्सव' चित्रपटातील 'सांझ ढले गगन तले' गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचा आवाज ऐकून रस्त्यावरून चालणारे लोक थांबतात आणि ऐकू लागतात. यावरून गार्डने आपल्या मधुर आवाजाने मन जिंकण्यात यश मिळवले आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला ट्विटरवर 1 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच यूजर्स त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. उत्कृष्ट गायन आहे असे बहुतेक लोक कमेंट करत आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलSuresh Wadkarसुरेश वाडकर