शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

'आईची माया'! दुकानात अडकलेल्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, ह्रदयस्पर्शी VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:19 IST

अलिकडेच इन्स्टाग्रामवर माय-लेकाराच्या नात्याचं वास्तव मांडणारा भावनिक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आला आहे.

Social Viral : आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्री कारानंतर शिकावे अ,आ, ई, अशी एक चारोळी प्रचलित आहे. याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ तु्म्हाला नक्कीच येईल. आईची माया ही निराळीच असते.  आईच्या प्रेमाची तुलना जगातील कोणत्याच गोष्टीबरोबर करता येत नाही. वेळप्रसंगी आपल्या लेकरासाठी संकटासमोर ढाल बनून जी उभी राहते ती म्हणजे आई असते. मनुष्य असो किंवा प्राणी दोघांच्या भावना या सारख्याच. फक्त माणूस आपल्या मनातील इच्छा, विचार बोलून व्यक्त होतो, पण मुक्या जनावरांना तेही करता येत नाही. पण अनेकदा त्यांनी केलेली कृत्यं आपल्या भावनांना साद घालतात.  

अलिकडेच इन्स्टाग्रामवर माय-लेकाराच्या नात्याचं वास्तव मांडणारा भावनिक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका दुकानात बंद असलेल्या आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केलेली धडपड कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये लहानसं कुत्र्याचं पिल्लू दुकानात अडकलं होतं. आपल्या पिल्लाचा दुकानाच्या आतून येणारा आवाज ऐकूण ती आई कासावीस झाल्याचं पाहायला मिळतंय.  आपल्या लेकराला बाहेर काढण्यासाठी ती आई आपल्या नखांचा वापर करत खड्डा खणताना दिसतेय. शटरची लादी फोडून ती दुकानाच्या आत जाण्याचा प्रयत्न करते, पण तिचा हा प्रयत्नदेखील फसतो.   दुकानात अडकेल्या पिल्लाचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी त्या दुकानदाराचा नंबर शोधून काढला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि या मायलेकाची भेट घडून आणली.

हा व्हिडिओ tarotguiddence-by-k  या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच अनेकांनी आपल्या लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून काहींनी तर या आईचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया