शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेऱ्याकडे पाहत मॅडमची सुपरफास्ट पेपर तपासणी; नेटकऱ्यांनी घेतली शाळा, Video पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:48 IST

अलिकडेच बिहारच्या एका शिक्षिकेचा सुपरफास्ट पेपर तपासणीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या नजरेत आलाय.

Social Viral : सोशल मीडियामुळे जग किती जवळ आलंय नाही! जगाच्या पाठीवर कुठे काय चाललंय याची पुरेपूर माहिती या माध्यमातून मिळते. सोशल मीडियावर रिल्स बनविण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. अलिकडेच बिहारच्या एका शिक्षिकेचा सुपरफास्ट पेपर तपासणीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या नजरेत आलाय. सध्या ही रिल चांगलीच चर्चेत आली आहे. त्यात एक शिक्षिका उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहे.

नुकताच राज्य शिक्षण मंडळाचा दहावी-बारावीच्या निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावी-बारावीचा निकाल अगदी वेळेतच लावता यावा असा शिक्षण विभागाचा मानस होता. अशातच विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवत शंभर नंबरी कामगिरी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका शिक्षिकेच्या व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

छपरा जिल्हा नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती पर्यवेक्षक शिक्षिका कॅमेऱ्याकडे बघत असून उत्तरे न पाहता, न वाचता गुण देत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्या ठिकाणी इतरही शिक्षक उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत. अतिशय बेजबाबदारपणे ती गुण देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याला धोका आहे, असे अनेकांनी म्हटले.

हा व्हायरल व्हिडीओ बिहारमधील असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या शिक्षेकेच्या अशा वर्तवणुकीवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या व्हिडीओची दखल घेत शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळपास ४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. परखड शब्दांत कमेंट करत नेटकऱ्यांनीच शिक्षिकेची शाळाच घेतली आहे. हा व्हिडिओ पाहून अशा पद्धतीने पेपर तपासले गेले असतील तर विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स का मिळणार नाहीत? अशी शंका देखील काहींनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBiharबिहारTeacherशिक्षक