शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

घे भरारी! अंतराळात पोहचताच सुनीता विल्यम्स यांनी केला डान्स; नासाने शेअर केली Video Clip

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 17:20 IST

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली आहे.

Social Viral : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली आहे. सुनीता विल्यम्स बुधवारी बोईंग यानातून आपल्या सहकाऱ्यांसमवेत तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासासाठी रवाना झाल्या. आपला सहकारी बुच विल्मोर यांच्यासोबत सुरक्षितरित्या त्या अंतराळातील स्पेस स्टेशनवर पोहचल्या आहेत.ज्या क्षणी त्या स्पेस स्टेशनवर पोहचल्या त्या क्षणी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशा मोहिमेवर उड्डाण करणारी पहिली महिला म्हणून सुनीता विल्यम्स यांनी नवा इतिहास रचला आहे. त्याचदरम्यान त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या अन्य वैज्ञानिकांना मिठी मारली. 

दरम्यान, सुनीता विल्यम्स ज्यावेळेस स्पेस स्टेशनवर पोहचल्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्यावर तिथे त्यांचं घंटा वाजवून स्वागत करण्यात येतं. खरतरं जर कोणी नवा सदस्य अंतराळात दाखल झाला तर तिथे घंटा वाजवून त्याचं स्वागत करण्याची परंपरा असल्याचं सांगण्यात येतं. बुच यांचे अंतराळ यान लॉचिंगनंतर गुरुवारी रात्री ११.०३ च्या सुमारास स्पेस स्टेशनवर उतरलं. विल्मोर आणि विल्यम्स पुढील स्टारलाीन स्पेसक्राफ्टच्या उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी जवळपास आठवडाभर स्पेस स्टेशनवर राहतील. त्यानंतर साधारणत: १४  जूनच्या दरम्यान त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. 

विल्यम्स यांची १९९८ मध्ये ‘नासा’द्वारे अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती आणि त्या २००६ मध्ये मिशन १४/१५ आणि २०१२ मध्ये ३२/३३ या दोन अंतराळ मोहिमांचा भाग होत्या. त्यांनी मोहीम-३२ मध्ये फ्लाइट इंजिनिअर आणि नंतर मोहीम-३३ च्या कमांडर म्हणून काम केले. 

@Boeing Space नावाच्या एक्स प्लॅटफॉर्मवर सुनीता आणि बुच यांचा अंतराळातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सुनीता विल्यम्स यांचा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाNASAनासा