मुंबईतील एका तरुणाने आपल्या आई-वडिलांना नवीन फ्लॅट भेट देऊन सरप्राईज केले. एका तरुणाने आपल्या पालकांना भाड्याचे घर दाखवण्याच्या बहाण्याने नव्याने सजवलेल्या फ्लॅटमध्ये नेले. परंतु, दारावर आपल्या नावाची पाटी पाहून आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता त्याने हे आपलेच घर असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकताच आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर वडिलांनी घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कपाळावर चुंबन घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जैन, असे तरुणाचे नाव आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आशिष जैन आपल्या आई वडिलांसोबत एका सजवलेल्या फ्लॅटमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो अचानक त्यांना घराची कागदपत्रे आणि दरावर लावलेल्या नेमप्लेटवर त्यांचे नाव असल्याचे दाखवतो. कागदपत्रे आणि पाटीवर आपली नावे पाहताच पालकांना धक्का बसतो. मुलगा जेव्हा हे घर आपले आहे, असे सांगतो, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर होतात. आनंदाने भारावून गेलेले वडील त्याला घट्ट मिठी मारतात आणि लगेच त्याच्या कपाळावर चुंबन घेतात. मग त्याची आईही त्याला मिठी मारते.
आशिष जैन यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'सर्वकाही' असे लिहिले. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पासून नेटकरी देखील स्तब्ध झाले. या हृदयस्पर्शी व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Web Summary : A Mumbai man surprised his parents by gifting them a new flat. He took them to the decorated flat under the pretext of showing a rental house. Seeing their names on the nameplate, the parents were shocked and overjoyed, embracing their son with tears of happiness.
Web Summary : मुंबई के एक व्यक्ति ने अपने माता-पिता को एक नया फ्लैट उपहार में देकर आश्चर्यचकित कर दिया। किराए का घर दिखाने के बहाने वह उन्हें सजे हुए फ्लैट में ले गया। नेमप्लेट पर अपना नाम देखकर माता-पिता हैरान और खुश हो गए, और खुशी के आँसुओं के साथ अपने बेटे को गले लगा लिया।