Viral Racing Video : सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. कधी कधी तर असे व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आई आणि मुलगा महागड्या आलिशान गाड्यांमधून रस्त्यावर शर्यत लावताना दिसले आहेत. अशी कार रेस कदाचित आजवर कुणीच पाहिली नसेल. यामुळेच हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.
या व्हिडीओमध्ये एक पंजाबी ड्रेस घातलेली एक महिला अतिशय आत्मविश्वासाने लाल रंगाची पोर्श गाडी वेगाने चालवताना दिसते. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती म्हणतो की, "मित्रांनो, माझ्या आईने माझ्यासोबत शर्यत लावली आहे आणि ती कारमध्ये एकटी आहे." इतक्यात लाल पोर्श कार त्या व्यक्तीच्या बाजूने अतिशय वेगाने निघून जाते. तर, हा माणूस स्वतः फॉर्च्युनर चालवत आहे. आई बाजूने निघून जाताच तो हैराण आणि आनंदीही होतो. मोकळ्या रस्त्यावर त्याची आई अतिशय आत्मविश्वासाने गाडी चालवतानाच ही शर्यत देखील एन्जॉय करत आहे.
माय लेकाच्या कार शर्यतीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 'triplezerothreee' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'एक सरासरी जाट मम्मी'. हा व्हिडीओ आतापर्यंत ४ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ३ कोटींहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने या महिलेला 'रेसर मम्मी' म्हटले आहे, तर आणखी एकाने लिहिले की, 'ही आतापर्यंतची सर्वोत्तम आई आहे'. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'तो तिला हलक्यात घेत होता, पण ती एक आई आहे', तर दुसऱ्या एका युजरने गमतीत लिहिले की, 'जर मला अशी सासू मिळाली, तर मजाच येईल'.