शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

VIDEO: माकडाची हुशारी! जखमी झाल्यावर स्वत:हून मेडिकलमध्ये आलं, बँडेजदेखील बांधून घेतलं ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:02 IST

Monkey First Aid Viral Video: माकडदेखील शांतपणे गोंधळ न घातला उपचार करून घेत होतं...

Monkey First Aid Viral Video: जंगलात राहणारे माकड बहुतांश वेळा कळपात फिरत असते. कधीकधी ही माकडं मानवी वस्तीतही येतात. ते जेव्हा एकत्र असतात, तेव्हा कुणीही त्यांच्याशी पंगा घ्यायला जात नाही. पण एखादं माकड चुकून मानववस्तीत आलं तर लोक त्याला त्रास देतात किंवा इजा करतात. काही लोक त्याला दगडंही मारण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे माकड जखमी होऊ शकते. पण सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पूर्णपणे वेगळाच आहे. कारण या व्हिडीओत माकड स्वतः उपचार घेण्यासाठी मानवी वस्तीत असलेल्या मेडिकलमध्ये येते आणि शांतपणे उपचार करून घेते.

ही व्हायरल घटना बांगलादेशातील मेहेरपूर येथील आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक माकड स्वतःवर उपचार करण्यासाठी स्वतःहून एका केमिस्टच्या दुकानात पोहोचते आणि केमिस्टला नीट जखम दाखवते. केमिस्ट त्या माकड्याच्या जखमेवर अँटीसेप्टिक लोशन आणि मलम लावतो. यावेळी आसपास बरेच लोक असतात. ते लोक लहानशा माकडाला धीर देत असतात. व्हिडिओच्या शेवटी, केमिस्ट त्या माकडाच्या जखमेवर बँडेजदेखील बांधतो. माकडदेखील शांतपणे गोंधळ न घातला उपचार करून घेते. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर pia.bengaltigress नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. लोक यावर मनापासून व्यक्त होताना दिसत आहेत. माकड हा प्राणी उड्या मारणारा असला तरीही त्याला नीट माया लावली तर तो माणसांशीही नीट वागतो, गोंधळ गडबड करत नाही, हेच या व्हिडीओतून दिसून येते, अशा प्रकारच्या कमेंट्स युजर्स करताना दिसत आहेत. तसेच, अनेकांनी या माकडाच्या हुशारीचेही कौतुक केले आहे.

टॅग्स :MonkeyमाकडViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलBangladeshबांगलादेशSocial Mediaसोशल मीडियाMedicalवैद्यकीय