Petrol Pump Viral Video : सोशल मिडियावर रोज कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ एकतर कधी पाहिलेले नसतात किंवा फारच वेगळे असतात. अलिकडे तर प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत, त्यामुळे उठसूठ कुणीही कुठलेही व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. जर व्हिडीओ फारच वेगळा असेल तर लगेच व्हायरल होतो. असाच एक अवाक् करणारा आणि प्रश्नात पाडणारा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पेट्रोल पंपवरील असून लोकांना इथे चाललेल्या प्रकाराबाबत प्रश्न पडला आहे.
पेट्रोल पंपवर गाडी घेऊन गेले तरच आपल्याला पेट्रोल मिळतं. पेट्रोल पंपावर बॉटलमध्ये पेट्रोल दिलं जात नाही. यावर कायदेशीर बंदी आहे. पण एका पेट्रोल पंपवर पेट्रोल छोट्या बॉटलमध्ये नाही तर चक्क पाण्याची मोठ्या टाकीमध्ये भरलं जात आहे. व्हिडिओत बघू शकता की, एक व्यक्ती पेट्रोल पंपवर पाण्याची एक टाकी घेऊन आला, ही टाकी १ हजार लीटरची वाटत आहे. या टाकीत कर्मचारी पेट्रोल भरत आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने जेव्हा मीटरवर फोकस केला तेव्हा दिसतं की, टाकीत आतापर्यंत ७६३ लीटर पेट्रोल भरलं आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे हे माहीत नाही. पण व्हायरल झालाय.
हा व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @WokePandemic नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय आणि याच्या कॅप्शनला लिहिलंय की, 'लोक पॅनिक होऊन डिझेल - पेट्रोल खरेदी करत आहेत. पेट्रोल पंपवर एका टाकीमध्ये हजार लीटर पेट्रोल भरणं कायदेशीर आहे का? कारण लोकांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल स्टोर केल्याने आग लागण्याचा धोका वाढू शकतो'. हा व्हिडीओ आतापर्यंत भरपूर लोकांनी पाहिलाय. एका यूजरने कमेंट केली की, हे कायदेशीर नाहीये. पेट्रोल पंपवर अशाप्रकारे पेट्रोल देता येत नाही. तर दुसऱ्याने लिहिलं की, हे पेट्रोल बाहेर विकलं जाईल, याला परवानगी नाहीये. हे बेकायदेशीर काम आहे.
Web Summary : A viral video shows a person filling a large water tank with petrol at a petrol pump, raising concerns about legality and safety of storing such large quantities due to fire hazards. The video sparks debate online.
Web Summary : एक वायरल वीडियो में एक व्यक्ति पेट्रोल पंप पर पानी की एक बड़ी टंकी में पेट्रोल भरता हुआ दिखाई दे रहा है, जिससे आग लगने के खतरे के कारण इतनी बड़ी मात्रा में भंडारण की वैधता और सुरक्षा के बारे में चिंताएं बढ़ रही हैं। वीडियो ने ऑनलाइन बहस छेड़ दी है।