Viral Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. पण कधीकधी नशिब असे वळण घेते की, या आनंदावर विरजण पडते. लग्नापूर्वी अशा काही घटना घडतात, ज्यामुळे एकतर लग्न पुढे ढकलावे लागते, किंवा रद्द करावे लागते. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हॉस्पिटलमध्ये बांधली लगीनगाठएका तरुणाचा लग्नाच्या काही दिवस आधी अपघातात पाय मोडला. अपघात इतका मोठा होता की, त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, परंतु लग्नाची तारीख आधीच ठरली होती. त्यामुळे जोडप्याने रुग्णालयातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या लग्नासाठी रुग्णलयाची खोली सजवण्यात आली, पाहुण्यांना बोलवण्यात आले.
व्हिडिओ पाहा
निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा अनोखा विवाह पार पडला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ येताच नेटकऱ्यांनी जोडप्याचे तोंडभरुन कौतुक केले. काहींनी याला खऱ्या प्रेमाचे उदाहरण म्हटले, तर काहींनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.