शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:45 IST

सध्या सोशल मीडियावर एका झोपडीवजा घराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित  केले आहे.

सध्या सोशल मीडियावर एका झोपडीवजा घराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित  केले आहे. बाहेरून अत्यंत सामान्य दिसणारे हे घर आतून पाहिले असता, त्यात श्रीमंतांच्या घरात असणाऱ्या सर्व सोयीसुविधा पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ अनेकांना 'अशी गरिबी आम्हालाही मिळू दे' असे म्हणायला लावत आहे.

अनोखा जुगाड!आजकाल सोशल मीडियावर आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात जुगाड ते विनोदी अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. असाच एक आगळावेगळा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. बाहेरून साधीसुधी झोपडी दिसत असली तरी, कॅमेरा आत गेल्यावर जे दृश्य दिसते, ते पाहून सारेच अचंबित झाले आहेत. या घरात एसी, मिनी फ्रिज आणि टीव्ही यांसारख्या आधुनिक वस्तू दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून काही जणांनी तर या व्यक्तीला 'प्रोफेशनल गरीब' असेही संबोधले आहे.

कोणत्याही गोष्टीला केवळ वरवर पाहून लगेच निष्कर्ष काढू नये, कारण काही गोष्टी दिसतात तशा नसतात. या म्हणीचे हे जीवंत उदाहरण आहे. बाहेरून अगदी सामान्य वाटणाऱ्या या घरात आत गेल्यावर तुम्हाला आश्चर्यकारक गोष्टी दिसतील. हे दृश्य पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील.

पाहा व्हिडिओ : 

या व्हिडिओमध्ये एक झोपडी दिसत आहे, तर आजूबाजूला हिरवीगार झाडे दिसत आहेत आणि घराबाहेर एक एसी युनिट ठेवलेले आहे. त्यानंतर जेव्हा कॅमेरा घरात प्रवेश करतो, तेव्हा आतील दृश्य खरोखरच धक्कादायक दिसते. या झोपडीच्या आत एसी, मिनी फ्रिज आणि टीव्ही बसवलेला आहे आणि एक व्यक्ती आरामात पलंगावर झोपून टीव्ही पाहताना दिसत आहे. बाहेरून साधी दिसणारी झोपडी आतून पूर्णपणे ऐषोआरामात नटलेली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ लोकांमध्ये तुफान व्हायरल होत आहे आणि तो पाहिल्यानंतर लोक 'अशी गरिबी देवाला सगळ्यांना देवो!' असे म्हणत आहेत.

सोशल मीडियावर धुमाकूळ!हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'theindiancasm' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक केले असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. यासोबतच लोक यावर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, "हा माणूस किती जबरदस्त गरिबीत जगत आहे!" तर दुसऱ्याने म्हटले की, "या पातळीची गरिबी देवाने प्रत्येकाला द्यावी!" आणखी एका युझरने कमेंट केली आहे की, "बाहेरून झोपडी, आतून पूर्ण राजवाडा आहे रे बाबा!"

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया