शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

ती आई होती म्हणुनी...अंडी वाचवण्यासाठी चिमणीने रोखला ट्रॅक्टर, व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 4:38 PM

चिमणीची अंडी वाचवण्यासाठीची धडपड पाहून तुम्हीही भावूक झाल्याशिवाय राहणार नाही.

आई ही शेवटी आई असते. ती आपल्या लेकरांसाठी जे काही करते ते कुणीही करू शकत नाही. याची वेगवेगळी उदाहरणे आपण वेळोवेळी बघत असतो. आईच्या शक्तीपुढे साऱ्या जगाला झुकावं लागतं. सोशल मीडियात सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आईचं असंच एक रूप बघायला मिळालं. उत्तर चीनच्या एका शेतात ट्रॅक्टरने काम सुरू होतं. पण अचानक एक चिमणी ट्रॅक्टरसमोर येऊन उभी राहिली. ट्रॅक्टर थांबवावा लागला, कारण ही चिमणी तिच्या अंड्यांची रक्षा करत होती.

हा व्हिडीओ चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने शेअर केला आहे. असे सांगितले जात आहे की, ही घटना उत्तर चीनच्या Ulanqab शहरातील आहे. साधारण एक मिनिटांच्या या व्हिडीओत चिमणी तिची अंडी वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. दोन्ही पंख पसरवून ती चालत्या ट्रॅक्टर समोर येते आणि त्याला रोखते.

तसं तर आपण नेहमीच बघतो की, मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पक्षी आणि प्राण्यांचा जीव घेत आहेत. पण इथे जरा वेगळं चित्र बघायला मिळालं. ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने माणूसकी दाखवली. त्याने ट्रॅक्टर थांबवला. ऊन जास्त असल्याने ड्रायव्हरने चिमणीसमोर एका बॉटलमध्ये पाणी ठेवलं. त्यामुळे लोक ड्रायव्हरचं कौतुक करत आहेत.

टॅग्स :chinaचीनSocial Mediaसोशल मीडिया