शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:50 IST

Baby Elephant Viral Video : एका हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकून घेतले आहे.

इंटरनेटच्या या युगात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकून घेतले आहे. हत्तीच्या पिल्लाचा क्यूटनेस पाहून नेटकरी देखील त्याचे खूप कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारं हे हत्तीचं पिल्लू एका छोट्याशा बेडकाला घाबरलं आहे. या बेडकाला भिऊन त्याने अक्षरश: जागेवरच उड्या मारल्या. त्याच्या या गोड कृतीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

हत्ती हा तसा शांतता प्रिय प्राणी आहे. हत्तीची छोटी पिल्लं धमाल मस्ती करणारी असतात. याचीच प्रचिती या व्हिडीओमधून येत आहे. हत्ती कितीही धिप्पाड प्राणी असला, तरी अगदी छोट्याशा जीवलाही तो किती घाबरतो, हे या व्हिडीओमधून पाहायला मिळाले आहे. 

काय आहे या व्हिडीओमध्ये?सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हत्तीचं पिल्लू आंघोळ करत मस्ती करताना दिसत आहे. सोंड उंचावून, पाणी उडवत त्याची धमाल सुरू आहे. याच दरम्यान एक बेडूक उड्या मारत हत्तीजवळ जातो. या बेडकाला पाहून हत्तीच्या पिल्लाची गाळण उडते. आपला पाय त्या बेडकावर पडू नये, म्हणून हत्ती देखील उड्या मारू लागतो. इतक्यात तो बेडूक त्याच्या जवळून निघून जातो. 

या हत्तीचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील 'rajamannai_memories' या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ९ लाख लोकांनी पाहिला असून, नेटकरी यावर भरभरून कमेंट्स देखील करत आहेत. सगळेच या हत्तीच्या पिल्लाचं खूप कौतुक करत आहेत.   

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके