शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वेगात येणारी ऑटो रिक्षा उडाली हवेत,काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 12:57 IST

भरधाव वेगाने रस्त्यावरून चालत असताना ऑटो रिक्षा हवेत उडाली, व्हिडिओ पाहून अंगावर काटाच येईल.

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही मनात धडकी भरेल. याच कारण असे की, या व्हिडिओमध्ये भरधाव वेगाने रस्त्याने जाणाऱ्या एका ऑटो रिक्षाचा भयानक अपघात घडला आहे. या अपघाताची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

देशभरात दररोज अनेक अपघात घडत असतात. काही अपघात गंभीर स्वरुपाचे असतात, तर काही अपघात किरकोळ असतात. मात्र, काही अपघातांमुळे मन सुन्न होते. रस्ते अपघाताचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक ऑटो रिक्षा अचानक उलटल्याचे दिसत आहे. कोणतेही कारण नसताना ऑटो रिक्षा अशी उलटली? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

ना खड्डा, ना अडथळा, तरीही अचानक रिक्षा उलटली

व्हिडिओमधील दृष्यांमध्ये तुम्ही पाहु शकता की, एका रस्त्यावर सुरळीतपणे वाहतूक सुरू आहे. मात्र, एका रिक्षाचे चाक अचानक निखळले. ही रिक्षा ५ ते १० फूट हवेत उडाली आणि बाजूला असलेल्या डिव्हाडर बॅरिकेट्सवर जाऊन आदळली. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तातडीने रिक्षाकडे धाव घेतली. मात्र, हा अपघात नेमका झाला कसा, हे समजू शकलेले नाही. रस्त्यावर ना खड्डा होता, ना रिक्षा डिव्हायडरला धडकली, ना मार्गात कोणताही अडथळा आला. मग अचानक रिक्षा अपघात कसा झाला, या प्रश्नाने नेटकरी हैराण झाले. 

ऑटो चालकाच्या मदतीसाठी लोक धावले

घडलेल्या अपघातानंतर तेथे उपस्थित असलेले सर्वजण ऑटोचालकाच्या मदतीसाठी धावले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्सही हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, पुढचे चाक निखलळे असून ते रिक्षाच्या आतमध्ये घुसले आहे. तर दुसर्‍या यूजरने म्हटले की, कदाचित रस्त्यावर भूत आले असेल. लोक मदतीसाठी धावून आले हे पाहून बरे वाटले, अशी कमेंट करत एका युजरने समाधान व्यक्त केले आहे.

येथे पाहा व्हिडिओ: 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम