Girl Funny Answer Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कधीही सांगू शकत नाही. हल्ली रस्त्यावर वॉक थ्रूच्या माध्यमातून पादचाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या व्हिडीओचे प्रमाण वाढले आहे. अशा व्हिडीओमध्ये रँडम माणसांना रस्त्यात थांबवून प्रश्न विचारले जातात आणि त्याचे उत्तर विचारले जाते. त्यातून बरेचदा विनोद निर्माण होतो. पण सध्या एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यात ती तिच्या उत्तराने साऱ्यांनाच अवाक् करते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक तरुण पार्कमध्ये चालणाऱ्या दोन मुलींना थांबवतो आणि त्यांना प्रश्न विचारतो, की तुम्ही एका दुकानात गेलात आणि तिथून तुम्ही ५ किलो बटाटे खरेदी केलेत. त्यानंतर दुसऱ्या दुकानातून तुम्ही ५ किलो समोसे खरेदी केलेत, तर मला सांगा कोणती पिशवी सर्वात जड असेल? व्हायरल मीम्समध्ये अनेकदा पाहिल्याप्रमाणे, मुलगी चुकीचे उत्तर देईल अशी त्या तरुणाची अपेक्षा होती. पण या मुलीचे उत्तर ऐकून लोक मुलाचीच टिंगल करत आहेत.
मुलीने काय उत्तर दिले?
मुलाच्या प्रश्नावर मुलगी उत्तर देते की, समोसाची पिशवी जड असेल. यावर तरुण लगेच म्हणतो की, अगं... तुला माहित नाही का दोघांचेही वजन ५ किलो आहे. त्यामुळे दोन्ही समान असणार. यावर मुलगी म्हणते, तुला हे माहिती नाही का की समोसा सोबत चटणीही मिळते. त्यामुळे तीच पिशवी जड असणार. तिच्या या उत्तरानंतर सारेच अवाक् होतात.
या व्हिडिओनंतर खूप मीम व्हायरल झाले आहेत. त्यात KBC मधला ७ कोटी जिंकल्याचा एक मीम देखील शेअर करण्यात आला आहे आणि व्हिडिओवर लिहिले आहे - वाह दीदी वाह! हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की नेटिझन्स या मुलीचे कौतुक करत आहेत.