शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१० अटेम्प्ट, ४ मेन्स अन् ४ वेळा इंटरव्ह्यू; तरीही UPSC मध्ये अपयश! उमेदवार नाराज, मग धावले नेटिझन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 19:52 IST

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावेळी टॉप-३ मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. श्रुती शर्मा देशात पहिली, अंकिता अग्रवाल दुसरी आणि गामिनी सिंगला तिसी आली आहे.

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावेळी टॉप-३ मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. श्रुती शर्मा देशात पहिली, अंकिता अग्रवाल दुसरी आणि गामिनी सिंगला तिसी आली आहे. एकीकडे यूपीएससीत यश प्राप्त केलेले उमेदवार आनंद व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी कठोर परिश्रम केले पण यश प्राप्त करू शकलेले नाहीत. अशाच अपयशी उमेदवारांपैकी एकानं ट्विटरवर आपली वेदना व्यक्त केली. त्यानंतर नेटिझन्स त्याचं मनोबल वाढवण्यासाठी धावून आले. 

अमरावतीच्या कुणाल विरूळकर (Kunal Virulkar tweet on UPSC) याचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये त्यानं आपलं दु:ख मांडलं आहे. अनेक प्रयत्न करूनही तो यूपीएससी क्लिअर करू शकला नाही. तसं तर ही वेदना केवळ कुणालचीच नव्हे, तर UPSC ची मनापासून तयारी करणार्‍या अनेक अपयशी उमेदवारांची वेदना आहे. अशा परिस्थितीत त्यांची निराशा होणं साहजिक आहे कारण या परीक्षेसाठी लोकांनी जे कष्ट घेतले, ते कदाचित इतर कोणत्याही परीक्षेसाठी करावं लागत नाहीत. 

कुणालनं ट्विटरवर व्यक्त केलं दु:ख“10 वेळा अटेम्प्ट, 6 मेन्स, 4 वेळा इंटरव्ह्यू देऊनही माझी UPSC मध्ये निवड होऊ शकलो नाही. माझ्या नशिबात काय लिहिलं आहे माहीत नाही", असं ट्विट कुणाल विरूळकर यानं केलं. त्यानं आपली निराशा ट्विटच्या माध्यमातून व्यक्त करताच नेटिझन्स त्यांला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आलेले पाहायला मिळाले. नाराज होण्याचं काहीच कारण नाही. प्रयत्नांती परमेश्वर, कधी ना कधी यश मिळेलच अशा भावना नेटिझन्सनं व्यक्त केल्या आहेत. 

नेटिझन्सनं दिलं प्रोत्साहनकुणालच्या या ट्विटला ५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे आणि ३०० हून अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्याचं दु:ख आपलं मानून अनेकांनी त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.  “कुणाल, तू एक आत्मविश्वासू व्यक्ती आहेस. तुमच्यासाठी भविष्यात यापेक्षाही चांगलं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. तुझ्यात अतुलनीय क्षमता आणि चिकाटी आहे", असं IAS अधिकारी जितिन यादव यांनी ट्विट केलं आहे. तर एका नेटिझननं "सर, तुम्ही आधीच विजेते आहात. देव तुम्हाला असं काहीतरी करण्याची संधी देत ​​आहे जे त्याला तुमच्याकडून घडवून घ्यायचं आहे". तर एका ट्विटरकरानं "प्रयत्न करत राहा पण हार मानू नका", असं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींचंही एक ट्विट शेअर करून अनेकांनी कुणालचं मनोबल वाढवलं आहे. मोदींनी आजच ज्यांची यावेळी निवड होऊ शकली नाही अशा उमेदवारांना नाउमेद न होण्याचं आवाहन केलं आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणSocial Viralसोशल व्हायरल