सोशल मीडियावर दररोज काहीतरी नवीन आणि मनोरंजक पाहायला मिळत असते. कधी हाणामारी, तर कधी कॉमेडीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, आता पती-पत्नीमधील भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एका पत्नीने आपल्या पतीला जाहीरपणे चोप दिल्याचे दिसत आहे. हे भांडण इतके वाढले की, ते थेट रस्त्यावरील गटारात पाडून त्यांनी एकमेकांना मारलं.
नेमकं काय घडलं?
हा व्हिडीओ एका गजबजलेल्या बाजारपेठेतला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पती-पत्नीमध्ये फक्त बाचाबाची होताना दिसते. पण, काही क्षणांतच हे भांडण हाणामारीपर्यंत पोहोचते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यात पत्नीने पतीला चांगलाच हाणला आहे. ती इतकी रागात होती की, तिने पतीवर थेट हल्लाच चढवला. भांडण वाढत असताना दोघेही रस्त्यावर असलेल्या एका गटारात पडले. पण, पत्नीने तिथेही संधी सोडली नाही. तिने पतीला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरूच ठेवली.
पत्नीच्या या हल्ल्यासमोर पती पूर्णपणे हतबल झाला होता. काही काळ त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर तो हार मानून जागेवरच बसला. आजूबाजूला असलेल्या लोकांनी भांडण थांबवण्याऐवजी मजा घेत तमाशा पाहिला. अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये हा थरार रेकॉर्ड करत होते. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ 'एक्स'वर 'gharkekalesh' नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, "पती-पत्नीचे नाते विश्वासावर चालते आणि जो विश्वास तोडतो त्याची हीच अवस्था होते." तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "पतीकडून नक्कीच काहीतरी मोठी चूक झाली असेल, म्हणूनच पत्नीचा राग इतका अनावर झाला आहे."