शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत दिल्लीतील प्रदूषणात प्रचंड वाढ,दोन तरुणांनी रचलेलं प्रदूषणावरील गीत होतंय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 16:47 IST

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये प्रदूषणात प्रंचड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Viral Video: दिल्ली (Delhi) आणि एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली आहे.त्यामुळे प्रदूषित हवेचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. याआधीही सोशल मीडियावर दिल्लीतील प्रदूषणाची वस्तुस्थिती दर्शवणारे फोटोज आणि व्हिडीओसुद्धा प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यातच आता अशा स्थितीत दोन तरुणांनी राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर भाष्य करणारे एक गाणे रचले असून, ते सर्वांच्या पसंतीस उतरले आहे.

दिल्ली एनसीआर परिसरातील प्रदूषणाची माहिती देणारं हे गाणं उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील में 'तुम्हे दिल्लगी भूल जानी पड़ेगी या गाण्याचं व्हर्जन आहे. या गाण्याला दोन तरुणांनी रचलं असून, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धूमाकूळ घालत आहे.

एका एक्स इंस्टाग्राम वापरकर्त्यांने ९ नोव्हेंबरला हा व्हिडीओ  शेअर केला आहे.त्यांनी या व्हिडीओला एक मजेशीर कॅप्शनदेखील दिली आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच संपूर्ण देशभरात प्रदूषणाने डोकं वर काढलं आहे. दरवर्षी हिवाळ्याआधी राजधानी दिल्लीची हवा खराब होणं हे प्रकरण काही नवं नाही. पण मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा दिल्ली एनसीआर परिसरात नागरिकांना श्वास घेणं अवघड झालं आहे. या संपूर्ण परिस्थितीवर उपहासात्मक टीका करणारं जबरदस्त गाणं तरुणांनी बनवलं. सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. शिवाय आतापर्यंत या व्हिडीओला १३ लाख व्यूज आणि ८१ हजार लाईक्स मिळाले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये  हे दोन तरुण गिटार आणि हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. या गाण्याची सुरुवात त्यांनी अशी केली आहे – बदल रही दिवाली है। ये काली चादर हर जगह, और खासी बनी कव्वाली है। तुम्हे क्लीन हवा भूल जानी पड़ेगी, दिल्ली एनसीआर में आकर तो देखो। आ... मत जाना। अस्थमा, ब्रोंकाइटिस से फिर ना बचोगे बिल हॉस्पिटल का घटा कर तो देखो। तुम्हे क्लीन हवा भूल जानी पड़ेगी... वोट मांगने जो नेता आते थे घर में, फोन उनको तुम अब मिलाकर तो देखो.... बाकी तुम्ही सोशल मीडिया साईट्सवर या संपूर्ण गाण्याचा आनंद घेऊ शकता.

येथे पाहा व्हिडीओ:

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम