शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

कर्तव्यनिष्ठेला सलाम! मुसळधार पावसात पोहोचवलं जेवण; Dominos च्या डिलिव्हरी बॉयवर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 12:09 IST

Dominos Delivery Boy Delivering Food During Heavy Rains : फूड डिलिव्हरीसाठी भरपावसात उभ्या असलेल्या एका डोमिनोजच्या डिलिव्हिरी बॉयचा फोटो हा सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर जगभरातील अनेक गोष्टी या जोरदार व्हायरल होत असतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. फूड डिलिव्हरीसाठी भरपावसात उभ्या असलेल्या एका डोमिनोजच्या डिलिव्हिरी बॉयचा फोटो हा सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी डिलिव्हिरी बॉयच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. डोमिनोजने देखील मुसळधार पावसात काम करणाऱ्या आपल्या बॉयचं भरभरून कौतुक केलं आहे. डोमिनोजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून माहिती दिली  आहे. तसेच सोशल मीडियावर देखील डिलिव्हिरी बॉयचीच जोरदार चर्चा रंगली आहे. 

शोवन घोष (Shovon Ghosh) असं डोमिनोज इंडिया (Dominos India) च्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. यामुळे कोलकातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच परिसरात भरपूर पाणी साचलं होतं. गुडघ्याभर पाण्यात डोमिनोजचा डिलिव्हरी बॉय शोवन फूड ऑर्डर दिलेल्या व्यक्तीची वाट पाहत होता. डोमिनोजने 12 मे रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शोवनचा पाण्यात उभा असलेला फोटो ट्विट करून कौतुक केलं आहे. यानंतर अनेकांनी ते ट्विट रिट्विट केलं असून त्याच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. 

डोमिनोजने शोवनच्या फोटो सोबतच "एक सैनिक कधीच आपल्या कर्तव्यापासून दूर जात नाही. आमच्याकडे ते निळ्या रंगात येतात आणि कोलकाताच्या पावसामध्ये गरमागरम ताजं आणि सुरक्षित अन्न लोकांना प्रदान करतात. आम्ही आमच्या #DominosFoodSoldier शोवन घोषच्या सेवेला सलाम करतो. ज्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील पावसात अडकलेल्या आपल्या ग्राहकांला भोजन देण्याची तयार दाखवली आणि ते पोहोचवलं" असं म्हटलं आहे. डोमिनोजच्या या डिलिव्हरी बॉयने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलRainपाऊसSocial Mediaसोशल मीडिया