शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:40 IST

एका तरुणीने आपला रेल्वे प्रवासाचा भयावह अनुभव शेअर केला आहे, ज्यामुळे महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रेल्वे प्रवास हा सगळ्यांसाठी विशेषत: महिलांसाठी सुरक्षित मानला जातो. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वे सुरक्षा दल आणि विशेष डबे अशी अनेक सुरक्षा व्यवस्था असते. तरीही, एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना अनेकदा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणीने आपला भयावह अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका तरुणीने तिची आपबीती सांगितली. तिने लिहिले की, "मी नुकताच ट्रेनने प्रवास करत होते. काही वेळानंतर मला कळले की माझ्या कोचमधील तिकीट तपासणी करणाऱ्या टीसीने मला इन्स्टाग्रामवर शोधले आणि फॉलो रिक्वेस्ट पाठवली. मला वाटतं की त्याने माझे नाव आरक्षण चार्टमधून घेतले असावे." या घटनेमुळे ती अस्वस्थ झाली आणि तिला हे खूपच विचित्र वाटले. कारण प्रवासादरम्यान दिलेली वैयक्तिक माहिती फक्त प्रवासापुरती मर्यादित असावी, अशी तिची अपेक्षा होती.

इन्टरनेटवर जोरदार चर्चा!या घटनेनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक युजर्सनी या घटनेची तक्रार करण्याची सूचना केली, तर काहींनी टीसी सोबत वाद घालू नये, असा अजब सल्ला दिला. एका युजरने लिहिले की, “कृपया ती रिक्वेस्ट स्वीकारू नकोस! हे खूपच विचित्र वर्तन आहे. जर तू ती रिक्वेस्ट स्वीकारलीस, तर तुला अनेक मेसेजेस येऊ लागतील.” 

दुसऱ्या एका महिलेने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले, “एकदा एका टीसीने माझे तिकीट तपासले आणि नंतर तो परत येऊन मला त्याच्या मागे यायला म्हणाला. मी लहान आणि घाबरलेली होते. मी त्याच्या मागे सेकंड एसीपर्यंत गेले. तिथे त्या व्यक्तीने मला सांगितले की, त्याला माझा मित्र बनायचे आहे आणि त्याने माझा नंबर देण्यासाठी जबरदस्ती केली.” या घटनेमुळे आता मोठी चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी