शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:54 IST

linkedin Viral Post: एका कर्मचाऱ्याने काहीही न सांगता नोकरी सोडल्याने नाराज झालेल्या कंपनीच्या एचआरने लिंक्डइनवर भलीमोठी पोस्ट लिहून खंत व्यक्त केली.

एका कर्मचाऱ्याने काहीही न सांगता नोकरी सोडल्याने नाराज झालेल्या कंपनीच्या एचआरने लिंक्डइनवर भलीमोठी पोस्ट लिहून खंत व्यक्त केली. संबंधित कर्मचाऱ्याने कोणताही फोन अथवा स्पष्टीकरण न देता नोकरी सोडल्याचेही एचआरने आपल्या पोस्टमध्ये सांगितले. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

 एचआरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "एका कर्मचाऱ्याने पहिल्याच दिवशी काहीही न सांगता नोकरी सोडली, हा तरुण सेल्स विभागात जॉईन होणार होता. सेल्सची नोकरी अधिक आव्हानात्मक आणि कठीण आहे, असे त्याला मुलाखतीदरम्यान सांगण्यात आले होते. मात्र, तरीही कर्मचाऱ्याने पहिल्याच दिवशी नोकरी सोडली. तुम्ही कुठेही नोकरी करा, तुम्हाला एका दिवसात सर्व काही शिकता किंवा परफेक्ट काम करता येत नाही. शिवाय, कोणतीही कंपनी २४ तासांत सर्वकाही सिद्ध करू शकत नाही. त्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. वेळ दिल्याशिवाय यश मिळवता येत नाही."

एचआरचा कर्मचाऱ्यांना मोलाचा सल्लानवीन ठिकाणी नोकरी करायला सुरुवात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एचआरने मोलाचा सल्ला दिला. एचआर म्हणाली की, "मुलाखतीवेळी उमेदवाराने आपल्या मनातल्या शंका विचारल्या पाहिजेत. ऑफर स्वीकारण्याआधी विचार करावा. घाई करू नये. मनातील सर्व प्रश्न स्पष्ट विचारायला हवे. कंपनीने ऑफर दिलीही पण तुम्हाला खात्री नसेल तर घाईने होकार देऊ नका. एकदा नोकरी स्वीकारली, तर त्याला योग्य न्याय द्या. अशा कृत्यांमुळे तुमचे नुकसान होऊ शकते."

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रियासंबंधित एचआरने केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, ही पोस्ट शेअर करण्यापेक्षा त्या कर्मचाऱ्याला काम का आवडले नाही, याचा शोध घ्यायला हवा. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "एचआर मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या वेळेचा आदर करत नाही. त्यांच्या क्षमतांना महत्त्व देत नाही, या गोष्टी एचआरसाठी सामन्य आहे. पण जेव्हा एखादा कर्मचारी अशा पद्धतीने वागतो, तेव्हा त्याला चुकीचे ठरवले जाते."

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल