शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:49 IST

हरयाणातील नूह येथील राष्ट्रीय महामार्ग २४८ वर घासैदा गावाजवळ एका बोलेरोचा अपघात झाला. मोठ्या आवाजात वेगाने येत असताना ती हवेत चार ते पाच वेळा उलटली.

हरयाणातील एका बोलेरो गाडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही गाडी हवेत चारवेळा पलटी होत असल्याचे दिसत आहे.हा अपघात हरयाणातील नूह येथील राष्ट्रीय महामार्ग २४८ दिल्ली-अलवर रोडवरील घासैदा गावाजवळचा आहे. या बोलेरोने दुभाजकाला धडक दिल्याने नियंत्रण सुटले. या अपघातात बोलेरो रस्त्यावर ४ ते ५ वेळा उलटली. बोलेरो गाडीचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीतील लोकांना बाहेर काढले. एवढा मोठा अपघात होऊनही तिघांना किरकोळ दुखापत झाली.

या बोलेरोचा आवाज एवढा मोठा होती की अनेकांना वाटले यामधील लोकांचा मृ्त्यू किंवा गंभीर जखमी झाले असतील. पण, असं काहीच झाले नव्हते. विमानातील लोक फक्त जखमी झाले होते. 

इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...

या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये बोलेरो कशी मोठ्या आवाजात उलटते हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीशी धडकल्यानंतर बोलेरो थांबते. व्हिडीओ पाहता, चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनसारखा जास्त वाटतो, यामध्ये बोलेरो वेगाने येते आणि चार ते पाच वेळा पलटी होते. या अपघातात कोणालाही साधी जखम सुद्धा झालेली नाही. ज्या ट्रॅक्टर ट्रॉलीशी ही गाडी टक्कर झाल्यानंतर थांबली त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये दोन लोक होते. 

बोलेरो दुभाजकाला धडकली

अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नुह येथून एक भरधाव वेगात येणारी बोलेरो कार येत होती. ज्यावेळी कार घासैदा गावात पोहोचली तेव्हा ती मध्यभागी असलेल्या दुभाजकाला धडकली. कारचा वेग जास्त असल्याने चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. यावेळी कार रस्त्याच्या मधोमध उलटली आणि बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. 

ही घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. यामध्ये बोलेराच्या चालकाने मागून एका स्कॉर्पिओ कारला ओव्हरटेक केले. तेथून, वेगाने येणाऱ्या बोलेरोचा तोल सुटला, ती बोलेरो पुढे जाऊन दुभाजकाला धडकली.

अपघात झाला तेव्हा बोलोरोमध्ये तीन जण होते. हे तिघेही रेवासन येथील त्यांच्या घरी जात होते. त्यांच्या गाडीचा अपघात होताच बघणाऱ्यांची गर्दी झाली, त्यांनी तिघांनाही गाडीतून बाहेर काढले. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये काही लोक जखमींना मदत करण्यासाठी धावतानाही दिसत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी नशिबानेच हो लोक वाचल्याची कमेंट केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघात