सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगतात काहीही गोष्टी व्हायरल होत असतात. कधी कुणाचे जुगाड, तर कधी कुणाच्या हरकती पाहून सगळेच हैराण होतात. मात्र, आता एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच स्तब्ध झाले आहेत. गालावरच्या खळीसाठी एका तरुणीने जो प्रताप केला आहे, तो पाहून तुम्हालाही कपाळावर हात मारून घ्यावा वाटेल.
एखाद्या व्यक्तीच्या गालावरची खळी त्याच्या सौंदर्यात आणखी भर घालते असं म्हणतात. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या गालावर खळी पडेल असे नाही. मात्र, सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यावरून आता ही गोष्ट सगळ्यांसाठी शक्य होईल असे वाटत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क तिच्या गालावर खळी पडावी यासाठी शस्त्रक्रिया करून घेत आहे. व्हिडीओमधील तरुणी हसते तेव्हा तिच्या गालावर सुंदर खळी पडते. मात्र, ही खळी नैसर्गिक नाही.
काय आहे 'ही' शस्त्रक्रिया?
अशा प्रकारे गालावर खळी पाडण्याची एखादी शस्त्रक्रिया देखील असते, याबद्दल कदाचित कुणाला फारशी कल्पनाही नसेल. या शास्त्रक्रियेला 'डिंपलप्लास्टी' म्हणतात. ही प्रक्रिया सामान्यतः सुरक्षित मानली जाते आणि पात्र सर्जनकडून केल्यास संसर्गाचा धोकाही कमी असतो.
लाखो लोकांनी पाहिला व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'gunsnrosesgirl3' या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "गालावर खळी तयार करण्यासाठी असलेल्या या कॉस्मेटिक प्रक्रियेबद्दल तुमचे काय विचार आहेत?" १३ सेकंदांचा हा व्हिडीओ २,६८,०००पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, शेकडो लोकांनी त्यावर लाईक केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मात्र, हा व्हिडीओ पाहून काही जण विचारत आहेत की, "हे किती सुरक्षित आहे?" तर, काही जण म्हणत आहेत, "डिंपल सुंदर दिसतात, पण शस्त्रक्रियेद्वारे ते तयार करणे हे काही योग्य नाही. काहींनी याला "सर्जनशील मनाचा पुरावा" म्हटले आहे, तर एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, "वैयक्तिकरित्या, मी कोणत्याही कॉस्मेटिक प्रक्रियेशी सहमत नाही, परंतु जर लोकांना ते योग्य वाटत असेल, तर कुणी कुणाला रोखू नये."
Web Summary : A woman's dimple surgery video goes viral, sparking debate. Dimpleplasty, a cosmetic procedure, creates artificial dimples. The video raises questions about safety and beauty standards.
Web Summary : एक महिला का डिंपल सर्जरी वीडियो वायरल हो गया, जिससे बहस छिड़ गई। डिंपलप्लास्टी, एक कॉस्मेटिक प्रक्रिया, कृत्रिम डिंपल बनाती है। वीडियो सुरक्षा और सौंदर्य मानकों के बारे में सवाल उठाता है।