शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

Video: तरुणीने एकतर नो पार्किंगमध्ये स्कूटर लावली, पोलिसांशी हुज्जत घातली; महिला पीएसआय येताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 09:52 IST

Social Viral: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने महिला दिनाशीदेखील जोडला आहे. ही घटना 7 मार्चची आहे. या तरुणीने तिची स्कूटर नो पार्किंगमध्ये उभी केली होती.

कर्नाटकच्या मंड्या शहरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका स्कूटर चालक तरुणीने चुकीची पार्किंग करत उलट तिच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच धारेवर धरले होते. प्रकरण पीएसआयपर्यंत जाताच महिला पोलिस अधिकारी तिथे आली आणि त्या भांडखोर तरुणीच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे. या तरुणीची 'भाईगिरीची' नशाच खाडकन उतरली आहे. (women PSI slaps girl who park scooter in no parking.)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने महिला दिनाशीदेखील जोडला आहे. ही घटना 7 मार्चची आहे. या तरुणीने तिची स्कूटर नो पार्किंगमध्ये उभी केली होती. पोलिसांनी ही स्कूटर उचलण्यासाठी कारवाई सुरु केली. ते पाहून धावत आलेल्या या तरुणीने पोलिसांसोबतच हुज्जत घालायला सुरुवात केली. तसेच ती स्कूटरवर जाऊन बसली. 

तिचे म्हणणे होते की, पोलिस तिच्याकडून दंड वसूल करू शकतात पण स्कूटर जप्त करू शकत नाहीत. व्हिडीओमध्ये एक पोलिस तिची स्कूटर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र, ती तरुणी असे करायला देत नाही आणि कोणत्यातरी भाईला फोन लावते. तेवढ्यात तिथे एक महिला पीएसआय पोहोचते आणि तरुणी तिच्याशी वाद घालायला लागते. यावर पीएसआय महिलेने तिच्या कानशिलात ठेवून दिली आणि तिची भाईगिरी उतरवली. या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला पोलीस कर्मचारी त्या मुलीला स्कूटरवरून बाजुला करत असल्याचे दिसत आहे. यावर ती तरुणी आणखी चिडते. या तरुणीकडे हेल्मेटही नाहीय. घटनास्थळी आणखी काही महिला पोलीस आहेत. त्यांच्यासोबत पुरुष पोलिसही आहे. 

पीएसआयने कानशिलात लगावल्यानंतर त्या तरुणीला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे तरुणीचे वय कमी असल्याने पोलिसांनी तिच्यावर पुढील कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. तसेच तिला कोणतीही कारवाई न करता केवळ समज देऊन सोडण्यात आले. 

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीKarnatakकर्नाटक