America Airplane : या वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना विमान कंपन्यांसाठी काळ बनून आलाय. या महिन्यात 6 मोठ्या विमान अपघातात 234 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरातून विमान अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता अमेरिकेतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. लॉस एंजेलिस विमानतळावर मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. दोन विमाने अचानक समोरासमोर आली.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी 4.20 वाजता घडली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक विमान टेकऑफ करत असताना, दुसरे विमान समोर आल्याचे दिसत आहे. दोन विमाने जवळ आल्याचे पाहून अधिकाऱ्यांचाही श्वास काही क्षण रोखला गेला. सुदैवाने विमानाची टक्कर झाली नाही, त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जगातील सर्वात धोकादायक विमानतळ, लँडिंग करण्यापूर्वी वैमानिकांचाही हात कापतो..!
मिळालेल्या माहितीनुसार, गोन्झागा युनिव्हर्सिटीचा पुरुष बास्केटबॉल संघ घेऊन जाणारे एम्ब्रेर E135 चार्टर जेट उतरले होते, तर डेल्टा एअरलाइनचे व्यावसायिक विमान दुसऱ्या धावपट्टीवरुन उड्डाण घेत होते. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळू नयेत, म्हणून हवाई वाहतूक नियंत्रकाने तातडीने चार्टर जेटला थांबण्यास सांगितले. सुदैवाने मोठा अपघात टळला. आता या प्रकरणाचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे.
विमान कंपन्यांसाठी 'काळ' ठरला डिसेंबर; एकाच महिन्यात 6 मोठ्या अपघातात 234 जणांचा मृत्यू