काहीजणांना फुकटची स्टाईल मारायला खुप आवडते. ही लोक जास्त शहाणपणा दाखवायला जातात आणि स्वत:च तोंडघशी पडतात. आपल्या अंगातली कलाकारी दाखवायला जातात आणि स्वत:चा अपमान करून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन बरीच लोक या व्हिडिओतील मुलावर हसत आहेत.
अनेकांनी तर या व्हिडिओखाली मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. हा व्हिडोओ पाहुन तुम्हाला प्रश्न पडेल की या मुलाने व्हिडिओत जे काही केलंय ते तो करतोय तरी का? काही जणांना हा व्हिडिओ पाहुन या मुलाने नशा तर केली नाही ना? असाही प्रश्न पडेल.तर या व्हिडिओमध्ये एक मुलगा उभ राहुन कोलांटी उडी मारायला गेला आणि गटाराच्या नळीत पडला. हे पाहुन तुम्ही खो-खो हसाल. तुम्हीच म्हणाल उगीच स्टाईल मारायला गेला आणि तोंडघशी गटारात पडला.इन्स्टाग्रामवर तरुणसा ऑफिशियल 07 या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. याला आतापर्यंत १४ हजारापेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे आणि शेकडो कमेंट्सही केल्या आहेत.