monkey snatches goggles viral video: जंगलात माकडं किती खोड्या काढतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. कधीकधी माकडे लोकांना इतके त्रास देतात की लोक त्यांच्यापुढे हतबल होतात. अनेक ठिकाणी माकडे लोकांच्या हातून अन्न किंवा इतर वस्तू हिसकावून घेतात आणि वर झाडावर चढून बसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत आणि तुफान कमेंट करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसून येते की, काही पर्यटक डोंगरावर चढाई करत असतात. जवळच दगडावर बसलेला एक माकड एका पर्यटकाचा चष्मा हिसकावून घेतो. माकड तो चष्मा नीट न्याहाळून पाहत असतो. हे पाहून पर्यटक सुरुवातीला काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. पण नंतर दुसरा एक पर्यटक अचानक माकडाचे लक्ष नसताना पटकन त्याच्या हातून चष्मा हिसकावून घेतो. हे पाहून माकड जोरात ओरडतो. पण त्याच्या हातून चष्मा गेलेला असतो, त्यामुळे तो माकडाला राग आलेला असूनही तो हल्ला करत नाही. हे दृश्य थेट एखाद्या विनोदी चित्रपटातील दृश्यासारखे वाटते. पाहा व्हिडीओ-
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @AMAZlNGNATURE या वापरकर्त्याने शेअर केला आहे. हा १४ सेकंदांचा व्हिडिओ १,९८,००० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शेकडो लोकांनी तो लाईक केला आहे आणि विविध मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.