Viral Video : हार टाकण्याची पद्धत हिंदू विवाहातील एक मुख्य प्रथा आहे. ज्यात नवरी आणि नवरदेव लग्नात स्टेजवर एकमेकांच्या गळ्यात हार टाकतात. अलिकडेच सोशल मीडियावर या क्षणाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. नवरदेव या रिवाजावेळ इतका कन्फ्यूज झाला त्याला काही सूचेना. त्याला बघून लग्नातील पाहुणे हसू लागले. नवरदेवासमोर उभी असलेली नवरी सुद्धा विचारात पडली की, हे नेमकं काय होत आहे. हा व्हिडीओ बघून आपण सुद्धा लोटपोट होऊ हसाल.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण बघू शकता की, नवरी-नवरदेव स्टेजवर उभे आहेत. नवरीने जसा हार टाकण्यासाठी हात पुढे केला, नवरदेव घाबरल्यासारखा दिसत आहे. आपण काही लग्नांमध्ये पाहिलं असेल की, नवरदेव आपली उंची कमी करण्यासाठी थोडी मान वाकवतात. पण हा नवरदेव तर आणखीनच जास्त साधा निघाला. डोकं वाकवण्याऐवजी नवरदेव थेट खाली बसला, कदाचित त्याला समजलंच नाही की, नेमकं करायचं काय आहे.
लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @khushi__jaat5050 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिलाय आणि हजारो लोकांनी याला लाइकही केलं. बऱ्याच लोकांनी या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, भावा...इतकी सुंदर पत्नी समोर बघून पॅनिक मोडमध्ये गेला. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, शेतात बसायची सवय गेली नाही भावाची. तर बरेच यूजर्स म्हणाले की, आता नवरी आयुष्यभर आपल्या लग्नाचा व्हिडीओ बघून हसेल.
Web Summary : A viral video shows a groom hilariously confused during the garland exchange ceremony. Instead of bending, he sits down, leaving the bride and guests laughing. The funny wedding moment has garnered thousands of views and humorous comments on Instagram, with users finding the groom's reaction priceless.
Web Summary : एक वायरल वीडियो में वरमाला समारोह के दौरान दूल्हा बुरी तरह से भ्रमित हो जाता है। झुकने के बजाय, वह बैठ जाता है, जिससे दुल्हन और मेहमान हंसने लगते हैं। इंस्टाग्राम पर इस मजेदार शादी के वीडियो को हजारों व्यूज और मजेदार कमेंट्स मिले हैं, यूजर्स को दूल्हे की प्रतिक्रिया अनमोल लग रही है।