शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: लग्नासाठी घोडी मिळाली नाही, चक्क गाढवावरुन काढली नवरदेवाची मिरवणूक; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 18:22 IST

नवरदेवाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Dulhe Ka Video: लग्नाशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हृदयाला भिडतात, तर काही खळखळून हसवतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील नवरदेवाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे, हा नवरदेव लग्नासाठी घोड्यावरुन जाण्याऐवजी चक्क गाढवावरुन जाताना दिसत आहे.

लग्नाच्या वरातीत नवरदेव नेहमी घोड्यावर दिसतो. घोड्यावर बसण्याचा नवरदेवांचा हट्ट असतो. पण, या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेवाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.  नवरदेवाला घोडी न मिळाल्याने तो चक्क गाढवावर स्वार होऊन लग्नात पोहोचला. वराला गाढवावर स्वार होताना पाहून तिथे उपस्थित सर्वांना हसू आवरता आले नाही. व्हिडिओमध्ये एक महिला गाढवावर बसलेल्या नवरदेवावर पैसे ओवाळताना दिसत आहे. काही युजर्सचा दावा आहे की हा व्हिडिओ कोरोनाच्या काळातील आहे. मात्र, हे प्रकरण कुठले आहे, हे कळू शकलेले नाही.

या व्हिडिओमध्ये गाढवासमोर वरातीमध्ये आलेले लोक नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'फुंटाप' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'घोडी नाही तर गाढव.' मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ यूजर्सना चांगलाच आवडला असून, यावर अनेकजण विविध कमेंट करत आहेत.

 

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके