घटस्फोट झाल्यानंतर कोणी मुलीचं स्वागत ढोल ताशा लावून जल्लोषात करताना तुम्ही बघितलंय का? मूळात घटस्फोट ही गोष्ट आपल्याकडे चिंता वाढवणारी म्हणूनच बघितली जाते, पण एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो बघून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर निवृत्त न्यायाधीश असलेल्या वडिलांनी ढोल-ताशाच्या गजरात तिचे स्वागत केले. इतकेच नाही, तर लोकांना लाडूही वाटले.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली आहे. घटस्फोटानंतर वडिलांनी मुलीचे फुलाचा हार घालत स्वागत केले. कुटुंबातील लोकांनी ढोल-ताशाच्या गजरावर ठेका धरला. वडील मुलीला घेऊन आले.
व्हायरल व्हिडीओतील पूर्ण प्रकरण
मेरठमधील शास्त्रीनगर परिसरात राहणारे निवृत्त न्यायाधीश डॉ. ज्ञानेंद्र शर्मा यांची मुलगी प्रणिताचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. प्रणिताचे लग्न शाहजहापूरमधील गौरव अग्निहोत्री याच्यासोबत झाला होता.
गौरव लष्करात मेजर या पदावर असून, जालंधरमध्ये ड्युटीवर आहेत. प्रणिताला एक मुलगाही आहे. पण, सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ होत असल्याने वाद वाढत गेला. सासरच्या छळाचे प्रकरण इतके वाढले की, घटस्फोटापर्यंत गेले.
प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने प्रणिता आणि गौरव यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. घटस्फोटाचा निकाल आल्यानंतर डॉ. ज्ञानेंद्र शर्मा हे कुटुंबीयांसह गेले आणि मुलीला वाजत गाजत घरी घेऊन आले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a retired judge celebrated his daughter's divorce by welcoming her home with music and distributing sweets. The daughter, married in 2018, faced harassment, leading to the divorce. The father honored her return, challenging societal norms.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक सेवानिवृत्त न्यायाधीश ने संगीत और मिठाई बांटकर अपनी बेटी के तलाक का जश्न मनाया। बेटी, जिसकी शादी 2018 में हुई थी, उत्पीड़न का सामना कर रही थी, जिसके कारण तलाक हो गया। पिता ने सामाजिक मानदंडों को चुनौती देते हुए उसकी वापसी का सम्मान किया।