शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

Video: भारतातील रस्त्यांवर वावरताना दिसला रुबाबदार ब्लॅक पँथर, दुर्मिळ फोटो कॅमेरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 17:02 IST

Viral Video of Black Panther: शिकाऱ्यांना ब्लॅक पँथरचा ठावठिकाणा लागू नये यासाठी जागेचा खुलासा केलेला नाही. 

जंगलात फिरत असलेल्या एका ब्लॅक पँथरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दुर्मिळ दृश्य भारतातील रस्त्यावर कैद झाले असून आतापर्यंत निश्चित स्थळाबाबत माहिती मिळालेली नाही. भारतीय वनसेवेतील अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटरवर या ब्लॅक पँथरचा व्हिडीओ शेअर केला आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हा व्हिडीओ पाठवला होता. शिकाऱ्यांना ब्लॅक पँथरचा ठावठिकाणा लागू नये यासाठी जागेचा खुलासा केलेला नाही. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या किनारी ब्लॅक पँथर उभा आहे. जेव्हा त्याला कार दिसते त्याक्षणी तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ रस्त्यावर फिरल्यानंतर ब्लॅक पँथर जंगलाच्या दिशेने जातो. हा व्हिडीओ कारमध्ये बसलेल्या एका माणसाने शूट केला आहे. प्रवीण कासवान  यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, भारताचा ब्लॅक पँथर.

हा व्हिडीओ  २४ ऑक्टोबरला  ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला १.६ लाख व्हिव्हज मिळाले असून आयएफएस अधिकारी यांनी ऑडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. कारण ते लोक जी भाषा बोलत आहेत. ती ओळखून त्या ठिकाणाचा अंदाज लावता येऊ शकतो. १३ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कमेंटमध्ये त्यांनी सांगितले की, भारताच्या अनेक राज्यांमध्ये ब्लॅक पँथर  दिसून येतो. हा केवळ सामान्य बिबट्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वाहतूक पोलिसाला झाडू मारताना पाहून नेटिझन्सनी केलं सॅल्यूट; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

काळा बिबट्या वेगळा कसा?

काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात. आफ्रिकेमधे ते माउंट केनियाच्या जंगलांमध्ये आहेत. मानलं गड्या! पार्ट टाईम जॉब म्हणून मास्तरानं सुरू केली शेती अन् आता घेतोय १ कोटींची कमाई

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल