बिहारच्या गया येथे हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी लग्न समारंभात रसगुल्ले कमी पडल्याने नवरा आणि नवरीकडील वऱ्हाडी मंडळी एकमेकांना भिडले. त्यात दोघांच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर नवरीच्या कुटुंबाने लग्नास नकार दिला त्यामुळे दोन्ही कुटुंबात तणाव आणखी वाढला.
गया येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी हे लग्न होते. नवरीकडील मंडळी हॉटेलमध्ये आधीच थांबले होते तर नवरा वऱ्हाड घेऊन तिथे पोहचला होता. लग्नाच्या विधी सुरू होणार होत्या. मात्र त्याआधी खाण्याच्या काऊंटरवर अचानक गोंधळ झाला. याठिकाणी पंगतीत रसगुल्ले कमी पडल्याने नवऱ्याकडील लोकांनी आक्षेप घेतला. या किरकोळ कारणावरून वाद इतका वाढला की दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लोकांनी एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या. भांडी फेकली. जे जे हाती लागेल ते एकमेकांवर फेकण्याचा प्रकार सुरू झाला.
घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. लग्नाचा सोहळा कुस्तीच्या आखाड्यात बदलला. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. एका रसगुल्ल्यावरून लग्न मंडपात कशी हाणामारी झाली हे व्हिडिओतून स्पष्ट दिसते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत नवऱ्याच्या चुलत भावाने सांगितले की, लग्नाची संपूर्ण व्यवस्था नवरीच्या लोकांनी केली होती. त्याठिकाणी जेवणावरून वाद झाला आणि हाणामारी सुरू झाली. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत काढली. मात्र त्यानंतर मुलीकडच्या लोकांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे हा तणाव वाढल्याचं त्याने सांगितले.
दरम्यान, या हाणामारीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले. दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी आहेत. लग्नाच्या विधीनंतर जोडपे मंडपाच्या दिशेने जात असताना हा राडा झाला. रसगुल्ले कमी पडल्याने हा वाद झाला परंतु त्यानंतर नवरीच्या लोकांनी हुंड्याबाबत खोटी तक्रार दिली असा आरोप नवऱ्याच्या वडिलांनी केला. नवऱ्याकडील कुटुंबाने लग्नाची तयारी दाखवली परंतु नवरीच्या कुटुंबाने हे लग्न करण्यास नकार दिला.
Web Summary : A Bihar wedding descended into chaos after a rasgulla shortage triggered a brawl between families. The bride's family refused to proceed with the marriage. The incident, caught on CCTV, resulted in injuries and property damage. A dispute over dowry also arose.
Web Summary : बिहार में एक शादी में रसगुल्ले की कमी के कारण झगड़ा हो गया, जिसके बाद दुल्हन के परिवार ने शादी से इनकार कर दिया. सीसीटीवी में कैद हुई इस घटना में कई घायल हुए और संपत्ति का नुकसान हुआ. दहेज को लेकर भी विवाद हुआ.