शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Video - यही तो प्यार है! आजारी पत्नीच्या उपचारासाठी ७८ वर्षांचा पती झाला डिलिव्हरी बॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:14 IST

७८ वर्षीय वृद्ध आपल्या पत्नीच्या उपचाराचा खर्च आणि घराचा खर्च भागवण्यासाठी या वयातही कष्ट करत आहे.

आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात, पण काही गोष्टी थेट काळजाला भिडतात. अमेरिकेतील अशीच एक भावूक गोष्ट समोर आली आहे, जिने लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलं. ७८ वर्षीय वृद्ध आपल्या पत्नीच्या उपचाराचा खर्च आणि घराचा खर्च भागवण्यासाठी या वयातही कष्ट करत आहे.

अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील मँचेस्टर शहरात ते 'फूड डिलिव्हरी'चे काम करत होते. ज्या वयात लोक आरामात आयुष्य घालवण्याची स्वप्नं पाहतात, त्या वयात हे गृहस्थ दररोज लोकांच्या घराघरात जाऊन अन्न पोहोचवत होते. त्यांचे कष्ट आणि आपल्या पत्नीसाठी असलेला त्यांचा संघर्ष पाहून सोशल मीडियावरील नेत्यांचे आणि सामान्य जनतेचं मन भरून आलं आहे.

७८ वर्षीय रिचर्ड पुली हे निवृत्त झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ काम करण्यात घालवला होता आणि आता त्यांना विश्रांती हवी होती. परंतु, परिस्थितीने त्यांना पुन्हा कामावर जाण्यास भाग पाडलं. झालं असं की त्यांच्या पत्नी ब्रेंडा यांची नोकरी गेली आणि त्यासोबतच त्यांचा मेडिक्लेम देखील संपला. यानंतर घराचा खर्च आणि औषधांचा खर्च उचलणं या दोघांसाठी अत्यंत कठीण झालं. 

रिचर्ड यांनी सांगितलं की, "मला काम करण्याची इच्छा नव्हती, पण नाईलाजास्तव मला पुन्हा सुरुवात करावी लागली. घरचा खर्च आणि मेडिकल बिल भरल्यानंतर महिन्याच्या शेवटी आमच्याकडे काहीच उरायचे नाही." या कठीण काळात पती-पत्नीने मिळून मार्ग काढला. ते फूड डिलिव्हरी ॲपद्वारे ऑर्डर पोहोचवू लागले. 

ब्रेंडा कार चालवायच्या आणि रिचर्ड घरांच्या दारापर्यंत जाऊन ऑर्डर द्यायचे. त्यांच्या लग्नाला ५६ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या वयातही दोघे एकमेकांचा आधार बनले होते. मात्र उपचाराचा खर्च आणि मर्यादित उत्पन्नामुळे त्यांचे जीवन खूप खडतर बनलं होतं. या गोष्टीला कलाटणी तेव्हा मिळाली, जेव्हा ब्रिटनी स्मिथ नावाच्या महिलेने रिचर्ड यांना आपल्या घरी जेवण पोहोचवताना पाहिलं. तिने आपल्या घराबाहेर बसवलेल्या कॅमेऱ्यात पाहिले की, एक वृद्ध गृहस्थ अत्यंत हळूवारपणे आणि सावधगिरीने तिच्या दारापर्यंत येत आहेत आणि तिची स्टारबक्सची ऑर्डर ठेवून परत जात आहेत. 

वय आणि मेहनत पाहून ब्रिटनी भावूक झाली. तिने हा व्हिडीओ 'टिकटॉक'वर शेअर केला आणि या वृद्धाबद्दल माहिती देण्याचं आवाहन केलं. काही तासांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हजारो लोकांनी तो पाहून या व्यक्तीला शोधण्यास सुरुवात केली. लवकरच सोशल मीडिया युजर्सनी शोधून काढलं की व्हिडिओमधील व्यक्तीचं नाव रिचर्ड पुली आहे. यानंतर लोकांना त्यांच्या आयुष्यातील खरी गोष्ट समजली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Love knows no age: 78-year-old delivers food for ailing wife.

Web Summary : To cover his wife's medical bills after she lost her job and insurance, a 78-year-old man works as a food delivery driver in Tennessee. His dedication moved many after a TikTok video went viral.
टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Videoव्हायरल व्हिडिओ