कोरोनानं महिलांचा रोजगार हिरावला; 'या' स्वयंपाकघरानं 'लय भारी' आधार दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 05:47 PM2020-08-31T17:47:39+5:302020-08-31T17:58:32+5:30

नोकरी सुटलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला होता

Ummid ki rasoi is becoming source of income of women who lose job due to covid 19 | कोरोनानं महिलांचा रोजगार हिरावला; 'या' स्वयंपाकघरानं 'लय भारी' आधार दिला

कोरोनानं महिलांचा रोजगार हिरावला; 'या' स्वयंपाकघरानं 'लय भारी' आधार दिला

Next

(Image credit- Dainik Bhaskar)

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ज्यांच्याकडे नोकरी होती त्यांची स्थितीही फारशी बरी नव्हती. वेतन कपात, कामाचे तास वाढवणं अशा वेगवेगळ्या प्रसंगांचा सामना जगभरातील  लोकांना करावा लागला. घरोघरी घरकाम करत असलेल्या महिलांचे काम पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. अशा  स्थितीत नोकरी सुटलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला होता. उम्मीद की रसोई या अंतर्गत अनेक बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध झाला. 

'उम्मीद की रसोई' याचे उद्दीष्ट कोविड १९ मुळे नोकरी गमावलेल्या गोरगरिब महिलांना रोजगार मिळून देण्याचे आहे. या उपक्रमाचा एक भाग असलेल्या आरती या दिल्लीच्या बुध्द नगर परिसरात राहतात. घरकाम करून त्या आपल्या कुटुंबाचं पोट भरत होत्या. कोरोनामुळे नोकरी गेल्यानं पैश्याच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या. अशा स्थितीत त्यांना उम्मीद की रसोईच्या माध्यमातून पुन्हा काम मिळालं आणि मिळकत सुरू झाली. 

Umeed ki rasoi

या उपक्रमाअंतर्गत महिला आपल्या घरून जेवण बनवून आणतात आणि या स्टॉलवर विक्री करतात. १८ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांचा यात समावेश आहे. आरती यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही पाच महिला मिळून तीन किलो भात आणि दोन किलो राजमा तयार करतो. साधारणपणे दुपारी २: ३० पर्यंत संपूर्ण जेवणं संपतं. सुरूवात राजमा भात या मेन्यूपासून केली असून पुढे आणखी काही पदार्थ यात समाविष्ट केले जाणार आहेत. 

नोकरी गमावेल्या महिलांना आधार आणि रोजगाार मिळण्यसाठी नवी दिल्लीतील उपनगरांमध्ये  हा उपक्रम राबवला जात आहे.  इतकंच नाही तर सुरूवातीला महिलांना प्रोफेशनल कुक्सकडून जेवण बनवण्याचं प्रक्षिक्षण दिलं जात आहे. विशेष म्हणजे  सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून, मास्कचा वापर करून या महिला आपलं रोजंचं काम करतात.

हे पण वाचा-

Video : तहानलेल्या मांजरीनं असं काही केलं....; 'आत्मनिर्भर' मनीमाऊचा व्हिडीओ व्हायरल

डायबेटीक कोमात होती आई, 5 वर्षांच्या मुलाच्या ‘खेळण्या’ने वाचवला जीव!

जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

Web Title: Ummid ki rasoi is becoming source of income of women who lose job due to covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.