शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, एक माकड मागे हटेना, पाहा हा Funny Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 17:24 IST

आज आम्ही तुम्हाला माकडांच्या भांडणाचा असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की माकडांच्या भांडणाचा (Fight Between Two Groups of Monkeys) असा व्हिडिओ याआधी कधीच पाहिला नाही.

माकड हे अतिशय मस्ती करणारं आणि मजेशीर प्राणी आहे. माकडाच्या मस्तीचे अनेक निरनिराळे व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील. माकडांची मस्ती अनेकदा आपल्या चेहऱ्यावरही हसू घेऊन येते. मात्र, अनेकदा हीच माकडे इतकं भयंकर रूप घेतात की पाहणाऱ्याचाही थरकाप उडतो. अनेकदा ही माकडं माणसांवरही हल्ला (Monkey Attacks on Human) करतात. अनेकदा तुम्ही माकडांना एकमेकांसोबत भिडतानाही (Monkey Fight) पाहिलं असेल.

आज आम्ही तुम्हाला माकडांच्या भांडणाचा असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की माकडांच्या भांडणाचा (Fight Between Two Groups of Monkeys) असा व्हिडिओ याआधी कधीच पाहिला नाही. सोशल मीडियावर सध्या माकडांच्या लढाईचा अतिशय भीतीदायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Monkey) होत आहे. या व्हिडिओमध्ये माकडांचे दोन गट आपसात भांडताना दिसतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक माकडं दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजून एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हालाही असं वाटेल जणू दोन राज्यातील सैन्य आपसात भिडलं आहे.

या व्हिडिओमधील माकडांच्या भांडणाची स्टाईल पाहून तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडिओ @Animal_World नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही पाहू शकता की एका जंगलात माकडांच्या दोन गटांमध्ये काहीतरी कारणावरुन वाद होतो. यानंतर दोन्ही गटांमध्ये भांडण सुरू होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक माकडं एकमेकांना मारत आहेत.

सुमारे १५ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तुम्हीही पाहू शकता की दोन्हीतील एकही गट मागे हटण्यास तयार नाही. ते एकमेकांवर हल्ला करत आहेत. दोन्ही गटातील अनेक माकडांनी आपल्यासोबत आपली पिल्लेही घेतलेली आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरMonkeyमाकड