Camel Tastes Lemon : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इंटरनेटचा वापर वाढल्यापासून कधीही कोणतीही क्लिप चर्चेत येते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू अनावर होईल. या व्हिडिओमध्ये (Viral Video) एका उंटाला लिंबाची चव चाखायला देण्यात आली. त्यावेळी उंटाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नक्कीच तुम्हालाही हसू येईल.
व्हिडिओमध्ये, एक जण लाकडी काठीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लहान निवडुंगाची रोपे लावतो आणि मध्यभागी एक लिंबू लावतो. खाणं पाहून उंट धावत येतो आणि पहिले निवडुंग खातो. नंतर तो काठीतून लिंबू त्याच पद्धतीने खातो. पण लिंबू चावताच त्याचा चेहरा अचानक बदलतो. आंबटपणाची चव येताच उंट डोळे मिचकावतो, ओठ दाबतो आणि विचित्र हावभाव करतो. इतकेच नव्हे तर उंट लिंबू थुकून टाकतो आणि नंतर निघून जातो. ती व्यक्ती उंटाला दुसरा निवडुंग खायला देण्यासाठी त्याच्या मागे धावते, परंतु यावेळी उंट काहीही खाण्याचा मोह टाळतो आणि पळ काढतो. पाहा व्हिडीओ-
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ShouldHaveAnima या युजरनेम असलेल्या अकाउंटने शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "फसवून लिंबू खायला दिल्यानंतर उंटाची प्रतिक्रिया." अवघ्या सव्वा मिनिटाच्या व्हिडीओला २ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, भन्नाट कमेंट्सही येताना दिसत आहेत.