Lion hunts Buffalo viral video: सोशल मीडियावर हल्ली जंगलातील व्हिडीओ खूप आवडीने पाहिले जातात. त्यातही शिकारीचे व्हिडीओ असल्यास लोक त्यावर हमखास व्यक्त देखील होतात. तसेच, नेटकरीही असे व्हिडीओ कायम व्हायरल देखील होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्यात सिंह चक्क एका भल्यामोठ्या म्हशीची शिकार करताना दिसतो. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.
व्हिडिओमध्ये दिसते की, आफ्रिकन जंगलात म्हशींचा एक मोठा कळप शांतपणे चरत होता. सर्वत्र शांतता पसरलेली दिसते. पण काही क्षणातच, ही शांतता वादळात बदलते. दूरून झुडुपातून एक सिंह बाहेर येतो. त्याची नजर म्हशींच्या कळपावर असते. नंतर तो हळूहळू खाली वाकून कळपाच्या दिशेने कूच करतो. सिंह येत असल्याची कुणकुण कळपाला होते. म्हशी सर्व दिशांना पळू लागतात. तेवढ्यात एक म्हैस कळपापासून दूर होते आणि तिथेच सिंह तिच्यावर झडप घेऊन तिला ठार करतो. सिंह म्हशीच्या नरडीचा घोट घेतो आणि ती सिंहाचे लक्ष्य बनते. पाहा व्हायरल व्हिडीओ-
हे संपूर्ण दृश्य जवळच्या सफारीवर असलेल्या काही पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केले. हे चित्तथरारक दृश्य पाहून सारेच थक्क झाले. @AmazingSights या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला एका दिवसताच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, हजारो लाईक्स आणि काही कमेंट्सही करण्यात आल्या आहेत.
Web Summary : A viral video shows a lion hunting a buffalo in Africa. The lion ambushes the grazing herd, singling out a buffalo, and swiftly killing it. Tourists on safari captured the dramatic scene.
Web Summary : एक वायरल वीडियो में अफ्रीका में एक शेर भैंस का शिकार करते हुए दिखाई दे रहा है। शेर चरते हुए झुंड पर घात लगाकर हमला करता है, एक भैंस को अलग करता है और उसे तुरंत मार डालता है। सफारी पर आए पर्यटकों ने इस नाटकीय दृश्य को कैद कर लिया।