शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Trending Brother Sister Video: भावाची माया... बहिण सायकलवरून पडू नये म्हणून दादाने केला भन्नाट जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 15:52 IST

भावा-बहिणीचं प्रेम बघून तुम्हाही म्हणाल- वाह!

Trending Brother Sister Video: लहानपणापासूनच भावंडांमध्ये खूप भांडणे होत असतात. मात्र, त्या भांडणात नेहमीच आपुलकी आणि भावंडांमध्ये प्रेम असतं. भाऊ-बहिणीत प्रेमाचं नातं असतं हे अगदी खरं आहे. म्हणूनच कितीही भांडणं झाली तरी त्यांच्यातील नातं टिकून राहतं. काही वेळी भाऊ-बहिणीती भांडणं अगदी टोकाची होतात की ते एकमेकांशी बोलत नाहीत, पण तरीही त्यांच्यातील प्रेम मात्र कमी होत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओने तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल.

भाऊ-बहिणीचे असे प्रेमळ नाते असते!

आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी, एका भावाने तिचे दोन्ही पाय सायकलला बांधले जेणेकरून ती सायकल चालवत असताना पडू नये. एका मुलाने आपल्या बहिणीला सायकलवरून पडण्यापासून वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे हे उत्तम उदाहरण आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा त्याच्या लहान बहिणीसोबत सायकल चालवताना दिसत आहे. सायकल चालवण्यापूर्वी, त्याची बहीण कॅरियरवर बसते आणि तो तिच्या चिमुकल्या पायांना कापडाच्या तुकड्याने बांधतो. तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सायकलवरून पडू नये म्हणून तो असं करतो आणि नंतरच तो प्रवास सुरू करतो. 'भावाचे प्रेम' असा कॅप्शनसह तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

भाऊ आणि बहिणीचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ पाहून लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. @urdunovels नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १६ हजारांहून अधिक लाईक्स आले असून सुमारे हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना या व्हिडीओतून भावा-बहिणीचे प्रेम दिसून येत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल