शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

ओह, श्वेता ‘हे’ तू काय केलं!; सोशल मीडियावर नेटिझन्सचा धुमाकूळ; का होतंय इंटरनेटवर ट्रेंड?

By प्रविण मरगळे | Updated: February 18, 2021 16:27 IST

Trending Girl Name is Shweta on Twitter: त्याच क्लासमधील एकाने हा संपूर्ण संवाद रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन झालं, तेव्हापासून आधुनिक तंत्रज्ञानाने या जगाला जवळ आणलं, घरात बसूनही लोक मिटींग घेऊ शकले, शिक्षणाचं नवं माध्यम ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. Zoom, Meet अशा एप्सवर अनेक विद्यार्थी, उद्योजक, प्रोफेशनल्स जोडले गेले, ग्रुप कॉल्सच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांशी संवाद साधत होते. याचे चांगले परिणाम जसे आहेत, तसेच काही असे किस्से घडले त्यामुळे सोशल मीडियात चर्चेला उधाण आलं. (Shweta memes trending in Social media internet)

आता हा किस्सा आहे श्वेताचा(Shweta). आता तुम्ही विचाराल की श्वेता कोण? श्वेता या मुलीचं नाव आहे जी झूम कॉलवर ऑनलाईन क्लासवेळी माईक ऑन ठेऊन तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. श्वेता आणि तिची मैत्रिण राधिका(Radhika) यांच्यातील कॉल संवाद व्हर्चुअल क्लासमधील १११ जणांनी ऐकला, यावेळी अनेकांनी श्वेता तुझा माईक ऑन आहे असं सांगितलं परंतु तिच्यापर्यंत कदाचित तो आवाज पोहचला नाही. श्वेता राधिकासोबत एका मुला-मुलीच्या रिलेशनशिपबद्दल गॉसिप करत होती. त्याच क्लासमधील एकाने हा संपूर्ण संवाद रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

सध्या श्वेता ट्विटरवर टॉप ट्रेंड करत आहे, श्वेता नावाने अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. श्वेतासोबतच त्या मुलाबाबतही अनेक जोक्स व्हायरल होत आहे, ज्याने त्याची प्रेमकहाणी श्वेताला ऐकवली होती. जवळपास ६-७ मिनिटांच्या या झूम कॉल रेकॉडिंगमध्ये श्वेता राधिकाला एका मुलाबद्दल सांगत होती, त्या मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम होतं, आणि श्वेतावर विश्वास ठेवत त्याने तिच्याबद्दल श्वेताला सांगितले. श्वेताने राधिकाला ही सगळी गोष्ट फोनवरून सांगितली. परंतु त्या दोघींचे हे बोलणं १११ जणांनी ऐकलं, यावेळी अनेकांनी श्वेता तुझा माईक बंद कर असं सांगितलं पण तिला ते ऐकायला गेलं नाही. आता यावर मीम्स व्हायरल होत आहेत.

ही पहिल्यांदाच नाही तर यापूर्वीही अनेक किस्से असे ऐकायला मिळाले आहेत. झूम कॉलवेळी एका बैठकीत पॉर्न व्हिडीओही प्ले केल्याची बातमी आहे, लॉकडाऊनकाळात अनेकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, पण त्यात असे किस्से घडले, ज्यामुळे अनेकांची गोची झाली.  

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाcorona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइन