घानामधील एका तरुणाने, आपण आधुनिक काळातील 'नोआ' (Noah) असल्याचे म्हटले आहे. त्याने आपला संबंध थेट बायबलमधील नोआच्या कथेशी जोडला आहे. त्याने एक मोठी नावही (ऑर्क ऑफ नूह) तयार केली आहे. याशिवाय, या तरुणाने, २५ डिसेंबर रोजी भीषण पाऊस होईल आणि महापूर येईल, तेव्हा नावेत शरण घेणणारेच वाचू शकतील, असा दावा ही केला आहे. दरम्यान, काही लोक भीतीपोटी त्यांच्या नावेचा आश्रय घेण्यासाठी पोहोचत आहेत.
'एबो नोआ' (Eboh Noah) असे या तरूणाचे नाव आहे. सोशल मीडियावर याचे अने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांत, तो २५ डिसेंबरला ख्रिसमरच्या दिवशी जग संपण्याचा दावा करत आहे. देवाने आपल्याला विनाश होणार असल्याची माहित दिली असून, प्रलयापासून वाचण्यासाठी नाव बनवण्याचा आदेश दिल्याचेही त्याने म्हटले आहे.
तीन वर्षे सतत पाऊस पडणार - एबोच्या दाव्यानुसार, २५ डिसेंबरपासून सुरू होणारा हा पाऊस पुढील तीन वर्षे सतत पडेल. या काळासाठी त्याने दहा नावांचा ताफाही तयार केला आहे. या काळात तो आणि त्याच्या अनुयायांच्या रक्षणासाठी, तो नावा तयार करत आहे. द सनच्या वृत्तानुसार, ऑगस्ट महिन्यात "काय होणार आणि कसे होईल" या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या यूट्यूब व्हिडिओमुळे एबो प्रथम चर्चेत आला होता.
अशी आहे नोआची कथा? बायबलमधील कथेनुसार, देवाने नोआला प्रलयापूर्वी एक महाकाय नाव बनवण्यास सांगितले होते. त्यामध्ये नोआचे कुटुंब आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीवजंतूची एक जोडी सुरक्षित ठेवण्यात आली होती. त्या काळी सलग ४० दिवस आणि ४० रात्री पाऊस पडला होता, ज्यामध्ये संपूर्ण सृष्टी नष्ट झाली होती. आता एबो त्याच कथेची पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा करत आहे.
Web Summary : Eboh Noah claims to be a modern-day Noah, predicting a catastrophic flood on December 25th. He built arks, promising salvation to those who seek refuge. Thousands, gripped by fear, are flocking to his arks, reminiscent of the biblical tale.
Web Summary : एबो नोआ ने खुद को आधुनिक समय का नोआ बताया है, जिसने 25 दिसंबर को प्रलयंकारी बाढ़ की भविष्यवाणी की है। उसने नाव बनाई है, जो शरण लेने वालों को बचाने का वादा करती है। डर से हजारों लोग उसकी नावों की ओर उमड़ रहे हैं, जो बाइबिल की कहानी की याद दिलाता है।