शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

Vira Video: कारमध्ये पतीशी होती भांडत, रागाने खाली उतरली आणि अचानक आलेल्या वाघाने फरफटत नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 16:09 IST

जंगलाच्या मधोमध बनवलेल्या रस्त्यावर अचानक गाडीतून खाली उतरल्याने एका महिलेला या मोठ्या चुकीचा फटका सहन करावा लागला. अचानक तिचं काय झालं (tiger drag woman in jungle viral video) हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण ही लोकांची सर्वात मोठी चूक आहे. जंगलाच्या मधोमध बनवलेल्या रस्त्यावर अचानक गाडीतून खाली उतरल्याने एका महिलेला या मोठ्या चुकीचा फटका सहन करावा लागला. अचानक तिचं काय झालं (tiger drag woman in jungle viral video) हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

ट्विटर अकाउंट @RANDOMFACTS2022 वर अनेकदा आश्चर्यकारक पोस्ट टाकल्या जातात. नुकताच या अकाऊंटवर आणखी एक धक्कादायक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. या व्हिडीओ (tiger attack video) मधील विचित्र गोष्ट अशी आहे की त्यात अचानक एक वाघ येतो आणि महिलेसोबत असे काही करतो (woman came out of car tiger drag her video) ज्याचा कदाचित कोणी विचारही केला नसेल.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या या व्हिडिओमध्ये एक कार अचानक रस्त्यावर थांबते आणि एक महिला गोंधळलेल्या अवस्थेत त्यातून बाहेर पडते आणि मागे वळून कारच्या दुसऱ्या बाजूला येते. ती बहुधा ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीशी बोलत असावी. या वाहनाच्या मागे आणखी २ कार थांबलेल्या दिसतात, जे कदाचित ही कार दूर जाण्याची वाट पाहत आहेत. तेवढ्यात एक मोठा वाघ येतो जो त्या महिलेचे पाय त्याच्या पुढच्या दोन पायांनी पकडून तिला झुडपांप्रमाणे ओढतो. वाघासोबत महिलेला ज्या प्रकारे ओढले जाते ते भयावह दृश्य आहे. कारमध्ये बसलेले लोक तिला वाचवण्यासाठी धावतात आणि इथे हा व्हिडिओ संपला आहे.

या व्हिडिओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ जंगलाचा नसून वन्यजीव सफारीचा असल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. ती आपल्या पतीशी वाद घालत असल्याने ती गाडीतून उतरली. याचवेळी या महिलेला वाघाने खेचले.

तपासात एबीसी न्यूज या परदेशी वेबसाइटचा २०१६ चा अहवाल सापडला. यात ही घटना कव्हर करण्यात आली होती. वेबसाइटनुसार, हा व्हिडिओ २०१६ मध्ये चीनमधील बीजिंग येथील एका राष्ट्रीय उद्यानातील आहे. ज्या महिलेवर हल्ला झाला ती 30 वर्षांची होती आणि ती या हल्ल्यातून वाचली होती. पण तिची आई, जी ५७ वर्षांची होती, तिचा मृत्यू झाला, असे अहवालात दिसून आले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरTigerवाघ